Home Breaking News भीषण अपघात भरधाव ट्रक ने बस ला मागून धडक 11 जणांचा जागीच...

भीषण अपघात भरधाव ट्रक ने बस ला मागून धडक 11 जणांचा जागीच मृत्यू

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

राजस्थान  :-  लखनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 21 वर पहाटे 5 वाजता भीषण अपघात घडला, या अपघातात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला.भावनगर वरून मथुरे ला जाणाऱ्या बसमध्ये अंदाजे 30 ते 40 प्रवासी होते,

मात्र सकाळच्या सुमारास भरतपूर आग्रा मार्गावर बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे वाहन चालकाने बस महामार्गावर थांबवित, दुरुस्ती करीत होते.रस्त्याच्या कडेला बस उभी केल्याने प्रवासी सुद्धा बसच्या बाहेर निघाले मात्र तितक्यात भरधाव असलेल्या ट्रक ने बस ला मागून धडक देत प्रवाश्यांना चिरडले, यामध्ये तब्बल 11 प्रवाश्यांचा मृत्यू झाला.मृतकामध्ये 6 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे, सर्व मृतक हे भावनगर गुजरात मधील रहिवासी आहे. अशे सांगण्यात येत आहे

12 ते 15 च्यावर प्रवासी या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे.अपघातानंतर इतर वाहन चालकांनी रस्त्यावर झालेल्या अपघाताला बघून वाहन थांबवित येथील जवळपास असलेल्या पोलिसांना सूचना दिली मात्र काही वेळ महामार्गावर वाहतूक व्यवस्था कोलमडली होती, पोलिसांना माहिती मिळताच 5 पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here