Home चंद्रपूर राजकीय कट्टा :- मनसे नेते राजू उंबरकर चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढणार?

राजकीय कट्टा :- मनसे नेते राजू उंबरकर चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढणार?

विदर्भातून मनसेला पहिला खासदार मिळण्याची संधी, प्रस्थापित भाजप काँग्रेसच्या उमेदवारांना शह देणार?

राजकीय कट्टा :-

खरं तर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचे जनतेप्रती काय कर्तव्य आहे, हे आजवरच्या चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा क्षेत्रातील खासदाराला जणू समजले नसावे किंव्हा उमगले नसावे, कारण भाजप काँग्रेस च्या खासदारांनी जनतेच्या कल्याणासाठी एखादा मोठा उपक्रम किंव्हा त्यांच्या हक्क अधिकारासाठी एखादा लढा उभारल्याचे ऐकीवात नाही तर फक्त खासदारकी मिळाली ती आपली जहांगीर आहे अशाच तोऱ्यात येथील खासदारांनी या लोकसभा क्षेत्रातील आपली कारकीर्द गाजवली हा आजवरचा अनुभव आहे, दरम्यान आता येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीचे बाशिंग बांधून काही लोक तयार आहे, पण त्यांच्याकडे या लोकसभा क्षेत्राचा विकास साधण्यासाठी काही उपाययोजना आहे कां ? असा प्रश्न जर कुणी केला तर स्वातंत्र्यापासूनचे जे निवडणुकीतील मुद्दे आहेत तेच त्यांच्या तोंडात आणि जाहीरनाम्यात असेल असेच एकूण राजकीय चित्र आहे. मग भाजप काँग्रेस सोडली तर तिसरा पर्याय तरी कोण आहे ? असा प्रश्न साहजिकच जनसामान्य माणसाला पडतो. त्यामुळं तिसरा पर्याय शोधायचा असेल तर असा एक नेता शोधावा लागेल जो खरोखरच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतो आणि त्यांची कधी जाहिरात करत नाही आणि असा नेता म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजू उंबरकर, वणी या विधानसभा क्षेत्रात आपल्या सामाजिक कार्यातून जनसामान्य माणसाच्या मनात घर केलेले राजू उंबरकर हे मागील दोन विधानसभा निवडणुकीत हरले खरे पण त्यांनी जनतेसोबतची नाळ तोडली नाही तर पुन्हा उमेदीने पक्ष संघटन वाढवून आणि पक्षाचे विविध उपक्रम राबवून या भागातील जनतेच्या शेतकरी शेतमजूर तरुण बेरोजगार यांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला नव्हे अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना स्वखर्चातून आर्थिक मदत व बी बियाणांची, पूर परिस्थितीत अन्नधान्यांची मदत करून बळीराजाला आधार दिला, आरोग्य सेवेत तर त्यांचे कार्यकर्ते 24 तास काम करतात व या लोकसभा क्षेत्रातील असा पहिला राजकीय नेता असेल ज्यांची सत्ता नसतांना मागील दहा वर्षांपासून अम्बुलन्स सेवा सुरू आहे व कुण्या गरीब व्यक्तीचं ऑपरेशन असो व त्याच वैद्यकीय उपचार असो राजू उंबरकर यांच्याकडे तो आला की हमखास मदत मिळालीच म्हणून समजा, असा नेता जर लोकसभेचा खासदार झाला तर या लोकसभा क्षेत्रात काय चमत्कार होईल, याचा अंदाज येतो.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी “जगाला हेवा वाटेल” असा महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प केला व त्यांनी त्यांच्या महाराष्ट्र विकासाचा जो आराखडा तयार केला त्यात त्यांची ती दुरद्रुष्टी सुद्धा दिसत आहे. पण या सर्व विकासाच्या कल्पना साकार करण्यासाठी पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यायला हवे तरच ते स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे मराठी माणसाचं नेत्रुत्व करणारा खासदार देशाच्या संसदेत पोहचणे तेवढेच महत्वाचे आहे, तेंव्हा मराठी अस्मिता व मराठी माणसाचं अस्तित्व टिकेल, राजू उंबरकर हे खऱ्या अर्थाने मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी संसद गाजवू शकतात व मराठी माणसांसाठी लढू शकतात त्यामुळं चंद्रपूर वणी आर्णी या लोकसभा क्षेत्रात त्यांनी लोकसभा लढवली तर मनसेचा चमत्कारिक विजय होऊ शकतो अशी राजकीय स्थिती आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस च्या बाळू धानोरकर यांनी भाजप च्या हंसराज अहिर यांचा दणदणीत पराभव करून महाराष्ट्रात काँग्रेस चा एकमेव खासदार म्हणून नावलौकिक मिळवला होता, आता तीच परिस्थिती या लोकसभा क्षेत्रात घडण्याची शक्यता असुन जर राजू उंबरकर लोकसभा लढले तर महाराष्ट्रात मनसेचा विदर्भातून एकमेव खासदार निवडून येण्याची त्यांची शक्यता दिसत आहे. कारण जनतेला परिवर्तन पाहिजे, तेच ते पक्ष आणि तेच ते नेते आणि त्यांच्या माध्यमातून काहीही साध्य होणार नसेल तर जनता नवख्या पक्षाच्या उमेदवाराला नक्कीच पसंती देतील असा एकुन राजकीय सूर आहे.

राजू उंबरकर यांचा कामाचा झंझावात वणी मारेगाव या दोन तालुक्यात आहेच, पण त्यांना चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघात कोणी ओळखत नाही असा एकही माणूस नसेल. नुकताच त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपताना दहीहंडीचा भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन वणी शहरातील जनतेला जणू उत्सव साजरा करायला लावला. त्या कार्यक्रमात मराठी प्रशिद्द अभिनेत्री प्राजक्ता माळी आल्या होत्या व त्यांनी वणीकरांचे खूप खूप आभार मानून राजू उंबरकर यांच्या या आयोजनाचे कौतुक केले. आपल्या कामाच्या माध्यमातून मराठी माणसांच्या गळ्यातील ताईत होणाऱ्या राजू उंबरकर यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी सर्वांची इच्छा आहेच, कारण जो तो खासदार होतो तो खास लोकांसाठी होतो पण तो जनतेचा होत नाही आणि म्हणून जनतेचा नेता म्हणून आणि जनतेचं प्रतिनिधित्व करणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून राजू उंबरकर हाच खासदार चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात निवडून जावा अशी तमाम मराठी माणसाची आशा अपेक्षा आहे.

Previous articleजिल्हाध्यक्ष बालमवार यांच्या वाढदिवशी विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश.
Next article२४ सप्टेंबरपर्यंत शैक्षणिक संस्था बंद राहणार कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसग्रस्तांची संख्या वाढली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here