Home चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बालमवार यांच्या वाढदिवशी विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश.

जिल्हाध्यक्ष बालमवार यांच्या वाढदिवशी विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश.

मनोज तांबेकर यांच्या नेत्रुत्वात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्यासह मनसे पदाधिकारी यांची उपस्थिती.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा दिनांक 10 सप्टेंबरला वाढदिवस मनसे कार्यकर्त्यांनी थाटात साजरा केला असतांना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे तालुका संघटक मनोज तांबेकर यांच्या नेत्रुत्वात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार. मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे. जनहित कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुढे. रमेश काळबांधे, पीयूष धुपे, राज वर्मा. वर्षा भोंबले व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

स्थानिक विश्रामगृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश घेण्यात आला असुन चंदू भगत. रहसुद्दिन शेख. विनोद धाबेकर. नागोजी सोनवणे. रवी बावणे. दिनकर बांगडे, शेरुभाई, नमसिन भाई. ओमजी शर्मा, कवडू चिंचोलकर, दत्ता उम्बरकर, विलास दांडेकर. अर्जुन खोब्रागडे व आश्विन देठे यांचा जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी पक्षाचा दुपट्टा खांद्यावर टाकून पक्ष प्रवेश घेतला यावेळी पक्ष स्थरावर त्यातील कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here