Home चंद्रपूर गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… बाप्पाचे जल्लोषात घरोघरी व सार्वजनिक मंडळात स्वागत

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… बाप्पाचे जल्लोषात घरोघरी व सार्वजनिक मंडळात स्वागत

  • अतुल दिघाडे
    जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  गणपती बाप्पा मोरया… मंगल मूर्ती मोरया… असा जयघोष करत मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यात आले. आज घराघरात बाप्पांचे आगमन होणार असून पुढील दहा दिवस मोठ्या जल्लोषात पूजाअर्चना केली जाणार आहे. दरम्यान, सोमवार ब मंगळवार सकाळपासूनच छोटा बाजार, आझाद गार्डनच्या बाजूला तसेच इतर ठिकाणी मोठ्या संख्येने गणपतीच्या स्टॉलवर नागरिकांनी गर्दी केली होती. सार्वजनिक मंडळांनी ढोलताशांचा गजरात तर घरगुती गणेशाचे दुचाकी, चारचाकी वाहनाने गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी मोठ्या उत्साहाने लगबग गर्दी बघायला मिळाली.

दहा दिवस गणरायाचे घरोघरी भक्तिभावाने पूजन केले जाणार आहे. घराघरात गणपती बाप्पाचे आगमन अगदी जोशात, जल्लोषात, उत्साहात आणि आनंदात  होत आहे. सार्वजनिक मंडळाच्या सदस्यांनी गणपती आणि आनंदात होत आहे. सार्वजनिक बाप्पाच्या आगमनाची तयारी सुद्धा केली आहे. पूजेला लागणारे सर्व साहित्य घेण्यासाठी बाजारात मोठी गर्दी बघायला मिळाली. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहरात १८० सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.

बाजारात या साहित्याची मागणी

चौरंग, पाट, मखर, नारळ, आंब्यांचे तोरण, काळी सुपारी, तांब्याचा गळवा, समई, अक्षता, जानवे, अष्टगंध, शेंदूर, विड्याची पाने, फळे, मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ.

सहकार्य करा: मनपा

नागरिकांनी घरगुती श्रीगणेशाच्या मूर्ती या कमी उंचीच्या ठेवण्यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. श्रीगणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष असून भाविकांनीही पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव संपन्न व्हावा, याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 

Previous articleवरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा अनुदान घोटाळ्याचा मास्टरमाईंड कोण?
Next articleखळबळजनक :- वरोरा विधानसभा क्षेत्रात भाजपच्या संभावित उमेदवारांची का होणार राजकीय आत्महत्या?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here