Home चंद्रपूर गणेश उत्सवाला तीन दिवस सुरूवात होऊन सुद्धा चंद्रपुरातील रेशन दुकानात अजून पर्यंत...

गणेश उत्सवाला तीन दिवस सुरूवात होऊन सुद्धा चंद्रपुरातील रेशन दुकानात अजून पर्यंत आनंदाची शिधा पोहचली नाही

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिध

चंद्रपूर  :-  मागील वर्षी शिधापत्रिका धारकांची दिवाळी गोड करण्यात साठी आनंदिचा शिधा वितरित केला होता त्यानंतर प्रत्येक सणाला आनंदाची शिधा देण्याची घोषणा राज्य सरकारने केली यानुसार गणेश उत्सवाला साखर, रवा, चनाडाळ व पाम तेल असा शिधा देण्याचे ठरले असता रेशन धारक लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले परंतु गणेश उत्सवाला तीन दिवस सुरूवात होऊन सुद्धा चंद्रपूर मधील अनेक भागातील रेशन दुकानात तरी अजून पर्यंत आनंदाचा शिधा मिळाला नसून लाभार्थ्यांना गणेशोत्सवात आनंदामध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विघ्न पडत आहे. असा प्रश्न चंद्रपुरातील शिधापत्रिका धारक यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर दिवाळीत आनंदाची शिधा देण्याची घोषणा झाली परंतु त्यावेळी नियोजनाचा अभाव दिसून आला असुन लाभार्थ्यांना दिवाळीनंतर किट मिळाली त्यामध्ये साखर, रवा, चनाडाळ व पामतेल प्रत्येकी एक किलो होते तसेच त्याची किंमत शंभर रुपये होती त्यानंतर सुद्धा सरकारने प्रत्येक सणाला आनंदाची शिधा अंतोदय प्राधान्य गट तसेच एपीएल व बीपीएल शिधापत्रिकाधारक कुटुंबाला देण्याची घोषणा केली, सगळीकडे गणेश उत्सव सुरू असून अजून पर्यंत लाभार्थ्यांना आनंदाची शिधा मिळाली नाही. त्यामुळे शिधापत्रिकाधारका मध्ये रोष वक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here