Home चंद्रपूर एक, दोन, नाही तर सारखे तीन वर्ष प्रथम क्रमांक पटकावणारा गणपती म्हणजेच...

एक, दोन, नाही तर सारखे तीन वर्ष प्रथम क्रमांक पटकावणारा गणपती म्हणजेच नवयुवक बाल गणेश मंडळ दत्तनगर चंद्रपूर

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूरला गणपती बघायला जायचं तर मग चला दत्तनगर अजीकर टीव्हीएस शोरूम जवळ

चंद्रपूर  :-  दरवर्षीप्रमाणे श्री. गणेश उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक सजावट आणि सामाजिक संदेश देणारा उत्तम देखावे सादर करत सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करणारे  श्री. नवयुवक बाल गणेश मंडळ, दत्तनगर,सार्वजनिक श्री हनुमान मंदिर,नागपूर रोड,चंद्रपुर, या मंडळामार्फत दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला असून सामाजिक संदेश देणारे उत्कृष्ट जिवंत देखावा त्यामध्ये बाप्पा आपल्या सर्व भक्तांना विविध रूपाने सामाजिक संदेश देत आहे.

काय आहे यावर्षी गणपतीचा संदेश 

प्लास्टिक पिशव्यामुळे गायांच्या होणारा मृत्यू, पर्यावरणाचे होणारे नुकसान, स्वच्छ भारत अभियान, सर्वेक्षण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा, अंधश्रद्धा निर्मूलनाची साफ सफाई, व्यसनमुक्ती,माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत वृक्षारोपण, सेंद्रिय शेती, स्त्रीभ्रूण हत्या व स्त्री पुरुष समानता असे सर्व देखावे एकाच ठिकाणी पाहायला मिळणार असून यातूनस सामाजिक व पर्यावरण विषयक जनजागृती करण्याच्या मंडळाचा उद्देश आहे.

सोबतच 350 व्या 🚩श्री शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त

किल्ले रायगडची आकर्षक कलात्मक प्रतिकृती देखाव्याच्या स्वरूपात सादर करण्यात आलेली असून महाराजांचा जीवनातले विविध प्रसंग, स्वराज्याचे शिलेदार, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, कंपोस्ट खत व गांडूळ खताचे महत्व तथा नियोजन हे सुद्धा आपणास या मंडळातर्फे  पहावयास मिळेल सोबतच श्री. गणेश उत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रम सुद्धा राबविण्यात येणार आहे.

चंद्रपुरातील नागरिकांना व खास बालगोपालांना मंडळाचे विनंती

सर्वांनी सदर प्रसंग एकदा जरूर अनुभवावा आणि उत्कृष्ट देखावा आपल्या लहान मुला मुलींना एकदा या नवयुवक बाल गणेश मंडळाला भेट द्यावी असे आव्हान या मंडळाचे कार्यकारणी, अध्यक्ष,  पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी केले आहे..

Previous articleमाणुसकी ग्रुपचा उपक्रम स्पंदन रोहनकर यांचा वाढदिवसानिमित्य डेबू सावली वृद्धाश्रमात जीवनोपयोगी वस्तूचे वाटप
Next articleराष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पुढाकार दोघांनी केले मुंडण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here