Home चंद्रपूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पुढाकार दोघांनी केले मुंडण

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पुढाकार दोघांनी केले मुंडण

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूरचे आमदार यांच्या निवासस्थानावर राज्य सरकारची प्रतीकात्मक तिरडी

 

चंद्रपूर  :-  राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रवींद्र टोंगे यांनी ११ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. परंतु, राज्य शासनाने या आंदोलनाची अजूनही दखल घेतलेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या उपस्थितीत रविवारी राज्य शासनाची प्रेतयात्रा काढून संताप व्यक्त करण्यात आला.

राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री, केंद्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष व चंद्रपूरचे आमदार यांच्या निवासस्थानावर राज्य सरकारची प्रतीकात्मक तिरडी काढण्यात आली. आंदोलनस्थळापासून निघालेल्या यात्रेला बस स्टॅण्ड चौकात पोलिसांनी थांबविले. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस मुख्यालयात नेण्यात आले. त्यानंतर आंदोलकांना सोडण्यात आले. तिरडी यात्रेत अॅड. पुरुषोत्तम सातपुते, अॅड. दत्ता हजारे, दिनेश चोखारे, बबनराव फंड, नंदू नागरकर, डॉ. अनिल शिंदे

प्रतीकात्मक तिरडी आंदोलनानंतर प्रा. सूर्यकांत खनके व सतीश मालेकर यांनी मुंडण करून राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. उपोषणकर्ते टोंगे यांची प्रकृती खालावल्याने तातडीने शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर विजयराव बलकी व प्रेमानंद जोगी यांनी अन्नत्याग करीत उपोषण सुरु केले आहे. राज्य शासनाने अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

नीलेश बेलखेडे, कुणाल चहारे, महेश खंगार, भूषण फुसे, गोपाल अमृतकर, पांडुरंग टोंगे, अनिल धानोरकर, रवींद्र शिंदे, भास्कर ताजने, मनीषा बोबडे, कुसुम उदार, गोमती पाचभाई, अजय बलकी, अनिल डहाके, सचिन निंबाळकर, गणेश आवारी, पप्पू देशमुख, प्रफुल बैरम, अक्षय येरगुडे, भाविक येरगुडे, राहुल चौधरी, सतीश भिवगडे, राजेश नायडू, संदीप कष्टी आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here