Home चंद्रपूर चंद्रपुरातील माणुसकी ग्रुपचे कार्य बघून डोळ्यात येतात अश्रू

चंद्रपुरातील माणुसकी ग्रुपचे कार्य बघून डोळ्यात येतात अश्रू

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-   सध्या चंद्रपुरातील माणुसकी ग्रुप चे नाव सर्विकडे प्रसिद्ध होत आहे. कारण या ग्रुप मध्ये पूर्ण युवा पिढी आहे आणि या युवा पिढीने आताच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनाच्या व्यतिरिक्त समाजाला काहीतरी नवीन दिशा व माणसातील माणुसकी जिवंत असल्याचे दाखवायचे काम करत आहे. कारण हा माणुसकी ग्रुप असा आहे की बेसाहारा किंवा बुद्धांना समोर येऊन त्यांची देखभाल आणि जीवनाशक वस्तू व खाण्यापिण्याची सोय करून देत आहे.

इतकेच नाही तर आपल्याला जे रेल्वे टेशन बस स्टॅन्ड किंवा कोणत्या चौकामध्ये गोरगरीब आणि बेसाहारा व्यक्ती दिसतात परंतु आपण त्यांच्या कडे दुर्लक्ष करत असतो पण चंद्रपुरातील या माणुसकी ग्रुप चे सदस्य यांना कोणत्याही प्रकारे कुठल्याही पद्धतीने माहिती मिळाली किव्हा अश्या प्रकारचे व्यक्ती दिसल्यास या ग्रुपचे सदस्य बिना कोणताही विचार करता ते जाग्यावर पोहोचतात आणि त्यावेळेस ते त्या व्यक्तीला आवश्यकता असेल या पद्धतीने कार्य चालू करतात उदाहरणार्थ आंघोळ पाणी, दाढी,नविन कपडे,व त्याला अति आवश्यक खाण्यापिण्याचे वस्तू देऊन त्यांची देखरेख करत असतात.

आजकालच्या या आधुनिक आणि भाग धोडीच्या जीवनात असे कोणीच नाही जे हे माणुसकी ग्रुप काम करत आहे. आणि म्हणूनच या माणुसकी ग्रुप मधील सर्व सदस्यांचे कराव तितके कौतुक कमी आहे. आणि यांचे कार्य बघून सर्वांच्या डोळ्यातीळ अश्रू आवरणे कठीणच असतात म्हणूनच चंद्रपुरातील माणुसकी ग्रुपचे जे कोणी एकदा कार्य बघितले की त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणारच नाही.

                नागरिकासाठी माणुसकी ग्रुपच्या संदेश

आपल्या एखाद्या नातेवाईकाचा किंवा स्वतःचा वाढदिवस सामाजिक रित्या साजरा करण्याची इच्छा असल्यास तर माणुसकी ग्रुपशी संपर्क साधावा.व आपल्याला कुठेही कोणत्या बेसाहारा वक्ती दिसल्यास तुम्हाला वाटले की त्याला कोणत्या प्रकारची गरज ची आवश्यकता असल्यास
माणुसकी ग्रुप चंद्रपूर संपर्क साधावा.
संपर्क -8055407941/8999645084

Previous articleराष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पुढाकार दोघांनी केले मुंडण
Next articleचिंताजनक :- ओबीसी आणि मराठ्यांनो आरक्षण कशासाठी मागताय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here