Home Breaking News भद्रावती शहरात ईगल व माझा अवैध सुगंधीत तंबाखूची विक्री करणारे ते कोण...

भद्रावती शहरात ईगल व माझा अवैध सुगंधीत तंबाखूची विक्री करणारे ते कोण ?

पोलीस व अन्न औषधी प्रशासन का करत नाही यांच्यावर कारवाई?

भद्रावती प्रतिनिधी :

राज्यात सुगंधित तंबाखू याला पूर्णतः बंदी असतांना सुद्धा पोलीस प्रशासन व अन्न औषधी विभागाच्या भ्रष्ट नीतीमुळे भद्रावती शहरात ईगल व माझा या अवैध सुगंधीत तंबाखूची खुलेआम विक्री सुरु असुन शहराच्या कानकोपरयात सगळ्या पान टपरीवर या तंबाखूचा खर्रा उपलब्ध असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना यासाठी भटकावे लागत नाही.

दारूबंदी उठल्यानंतर अवैध व्यवसाय म्हणून या सुगंधित तंबाखू विक्रीकडे तस्करांच्या नजरा लागल्या आहे व भद्रावती मध्ये नवनवीन विक्रेते जन्म घेत आहे. दरम्यान ईगल व माझा या अवैध सुगंधीत तंबाखूची खुलेआम विक्री करणारे ते कोण आहेत हे पोलिसांना व अन्न औषधी विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना चांगले ठाऊक आहे, पण हप्ता वसुलीच्या चक्रव्यूहात अभयदान मिळतं असल्याने अवैध सुगंधित तंबाखू विक्रेत्यांची ताकत वाढली आहे व त्यांनी त्यांच्या विरोधात बातमी लिहिणाऱ्यालाचं धमकावण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे बोलल्या जातं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भद्रावती शहरात चंद्रपूर नागपूर रोडवरील खर्राटपरी, भगाराम वार्ड, नवीन उड़ान पुलजवळ, किल्ला वार्ड, मंजूषा ले आउट इत्यादी भागात अवैध सुगंधित तंबाखू ची विक्री जोमात असुन याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष का करत आहे हे कळायला मार्ग नसून यावर त्वरित प्रतिबंध लावण्यात यावा अशी मागणी होत॑ आहे.

Previous articleचिंताजनक :- ओबीसी आणि मराठ्यांनो आरक्षण कशासाठी मागताय ?
Next articleकोयला व भंगार तस्कर युनिस पर कई मामले दर्ज, तडीपार करनेकी मांग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here