Home भद्रावती दीपक तुरारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या भद्रावती तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती.

दीपक तुरारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या भद्रावती तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती.

राज्याचे कैबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र.

भद्रावती :-

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार व अजित पवार गटात राष्ट्रवादी पक्ष विभागाला गेला असतांना आता प्रत्तेक पक्षाचा संघटनात्मक विस्तार सुरू आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा अजित पवार गटाचे काम जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भद्रावती विधानसभा प्रमुख विलास नेरकर यांच्या नेत्रुत्वात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्षाला बळकटी देण्यासाठी भद्रावती शहर अध्यक्ष म्हणून नुकतीच गितेश सातपुते यांची नियुक्ती झाल्यानंतर दीपक तुराळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या भद्रावती तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीमुळे दीपक तुरारे यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जातं आहे. दरम्यान आशिष दैवलकर यांनी सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला असल्याची माहिती आहे.

राज्याचे कैबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते दीपक तुरारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या भद्रावती तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, जेष्ठ नेते अबिद अली. वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख विलास नेरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राकेश सोनानी, भद्रावती शहर अध्यक्ष गितेश सातपुते, चंद्रकांत कुंभारे, बाळूभाऊ जोगी, ओंकार वरखडे, आशिष दैवलकर इत्यादींची उपस्थिती होती.

Previous articleचंद्रपुर मनपात आपत्ती धोके निवारण दिन साजरा
Next articleधक्कादायक :- एका ऑडियो क्लिपने सापडले वरोरा कृ.उ.बा.स कांदा घोटाळ्याचे आरोपी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here