Home वरोरा धक्कादायक :- एका ऑडियो क्लिपने सापडले वरोरा कृ.उ.बा.स कांदा घोटाळ्याचे आरोपी?

धक्कादायक :- एका ऑडियो क्लिपने सापडले वरोरा कृ.उ.बा.स कांदा घोटाळ्याचे आरोपी?

पाच शेतकऱ्यांचे पैसे मला द्या अन्यथा वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर जहर पिणार, ऑडियोतून कर्मचाऱ्याला राजकीय कार्यकर्त्यांचा इशारा.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा कृषी उत्पादन बाजार समिती च्या सचिवासह व्यापारी, कर्मचारी व दलाल यांनी कांद्यावर मिळणारे अनुदान लाटण्यासाठी तब्बल ६५ हजार क्विंटल कांदा खरेदी केल्याचे दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर व लाभार्थी शेतकऱ्याकडून ५० टक्के कमिशन घेतल्याची बाब जाहीर झाल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण आले होते व कित्तेक राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी कांदा अनुदान लाटणाऱ्यांना व्यापारी व संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान या प्रकरणी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, पण एका राजकीय कार्यकर्त्यांनी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी गारघाटे यांना भ्रमणध्वनीवरून फोन करून तुम्ही शेतकऱ्यांकडून कांदा अनुदानाचे पैसे घेतले व माझ्याकडे चाळीस शेतकऱ्यांचे फोन रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे तुम्हांला यातून वाचायचे असेल तर यामध्ये कोण कोण आहेत त्यांची नावे सांगा व मला पाच शेतकऱ्यांच्या कांदा अनुदानाचे पैसे परत करा, अन्यथा मी आपल्या बाजार समिती समोर जहर पिणार असा इशारा दिला होता. त्यामुळं वरोरा कृषी उत्पादन बाजार समितीचे कर्मचारी गारघाटे यांनी या प्रकरणात व्यापारी शेंडे, तेलतुंबडे व बाजार समिती सचिव चंद्रसेन शिंदे आणि व्यापारी तेला हे प्रमुख सूत्रधार असल्याचे सांगितले. हा ऑडियो रेकॉर्डिंग आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने वरोरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली असुन या कांदा अनुदान घोटाळ्याचे मुख्य आरोपी आता समोर आले आहेत.

राज्य सरकारने कांद्याचे भाव कोसळल्यानंतर २३ फेब्रुवारी ते मार्च २०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड मार्फत कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति टन अनुदान जाहीर केले होते. सरकारने जाहीर केलेले हेच अनुदान लाटण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव चंद्रसेन शिंदे व व्यापारी तेला यांनी कांदा खरेदी केल्याचा बनाव करून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला होता आणि काही शेतकऱ्यांकडून कांदा अनुदानाचे कमिशन वसूल सुद्धा करण्यात आले होते, मात्र ही बाब जेंव्हा उघड झाली तेंव्हा यांनी केलेला हा बनाव समोर आला, या प्रकरणात कुणाला किती पैसे मिळाले यांची उत्सुकता सर्वाना होती व मला सुद्धा यातील हिस्सा मिळाला पाहिजे म्हणून जो तो या घोटाळ्याचे प्रमुख दोन सूत्रधार यासह काही कर्मचारी व व्यापारी यांच्याकडून दानदक्षिणा मिळते का यासाठी प्रयत्न करीत होते, मात्र ज्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला त्या चिकटे यांच्या विरोधात शेतकरी, सचिव (चंद्रसेन शिंदे)व व्यापारी तेला होते त्यामुळे शेतकऱ्यांना समोर करून माजी सभापती राजु चिकटे यांना शेतकऱ्यांनी घेराव करून जाब विचारला त्यात त्यांनी आमदारानी किती पैसे घेतले हा प्रश्न सुद्धा केला त्यामुळे कांदा अनुदान प्रकरण हे कुणाचं राजकीय भविष्य खराब करेल तर कुणाची नौकरी घालवणार आहे, मात्र त्यात गुन्हा नसलेल्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट होणार असल्याने शेतकऱ्यांना यात दोषी धरू नये अशी मागणी होत॑ आहे.

काय आहे खोटारडेपणा?

वरोरा तालुका हा सोयाबीन, कापूस आणि धान उत्पादक तालुका आहे. या तालुक्यात कांद्याचे पीक फक्त ७५ हेक्टरवर होते असे कृषी अधिकाऱ्यांची माहिती आहे पण वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत ६५ हजार क्विंटल कांदा विकला गेल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या ६७६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे २ कोटी ३० लाख ७६ हजार रुपये अनुदान जमा झाले मात्र हा चक्क खोटारडेपणा असुन ज्याअर्थी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा विकत घेतला जातं नाही व या क्षेत्रात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होत॑ नाही तर तब्बल ६५ हजार क्विंटल कांदा खरेदी केल्याचे कसे दाखवण्यात आले ? हा गंभीर प्रश्न असुन यामध्ये प्रमुख सूत्रधार असलेल्या सचिव चंद्रसेन शिंदे व व्यापारी तेला यांच्यासह शेंडे, तेलतुंबडे व कर्मचारी गारघाटे यांच्याकडून पैसे वसूल करण्यात यावे अशी मागणी होत॑ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here