Home चंद्रपूर सोशल मीडियावर प्रचलीत मीम्स “जल्दी वहासे हटो व इलेक्ट्रॉनिक भोंग्याचा वापर करत...

सोशल मीडियावर प्रचलीत मीम्स “जल्दी वहासे हटो व इलेक्ट्रॉनिक भोंग्याचा वापर करत मनसेचे अनोखे आंदोलन.

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  महानगरपालिकेचा कार्यकाल संपलेला आहे परंतु अद्याप निवडणुका झाल्या नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेवर चंद्रपूर मनपा आयुक्तांची प्रशासक म्हणून शासनाने नियुक्ती केलेली आहे. सर्व आजी नगरसेवक आता माजी नगरसेवक झालेले आहे. त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांवर कुणाचीही वचक राहिली नाही. म्हणूनच प्रशासक राजमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेतील नागरी समस्यांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. वातानुकूलित केबिनच्या बाहेर निघून शहरात फेरफटका मारून शहरातील नागरी समस्या जाणून घेण्यास कोणताही मनपा अधिकारी इच्छुक नाही.

त्यामुळे नागरी समस्यांचे डोंगर चंद्रपूर महानगरपालिकेतील नागरिकांपुढे आवासून उभा आहे. नालेसफाई, पथदिवे दुरुस्ती, पाणीपुरवठा, मोकाट जनावरे व कुत्रे, रस्त्यावरील खड्डे,अत्यावश्यक विकास कामे, नागरी आरोग्य, मनपा शालेय शिक्षण, शाळांची दुरावस्था, नागरिकांच्या घरकुलाचा प्रश्न आदी सर्व समस्या दुर्लक्षित आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे शहर अध्यक्ष सचिन भोयर यांनी  सोशल मीडियावर प्रचलीत मीम्स “जल्दी वहासे हटो व इलेक्ट्रॉनिक भोंग्याचा वापर करत अनोखे आंदोलन केले.

मनपा अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये जाऊन इलेक्ट्रॉनिक भोंग्या द्वारे अधिकाऱ्यांना उद्देशून “जल्दी वाहासे हटो वरणा लाईट दुरुस्त करो” जल्दी वाहसे हटो वरणा नाली साफ करो” जल्दी वाहसे हटो वरणा पाणी दो” “जल्दी वाहासे हटो वरणा अतिक्रमण हटावो” अश्या घोषणा देत महानगर पालिका हादरून सोडली. इलेक्ट्रॉनिक भोंग्यचा वापर करत चंद्रपूर महानगर पालिका हद्दीतील नागरी समस्यांचा पाढा अधिकाऱ्यांसमोर सचिन भोयर यांनी वाचला. अश्या प्रकारे भोंग्याचा वापर करत बहिऱ्या मनपा प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न चंद्रपूर मनसे तर्फे करण्यात आला. महानगर पालिका बाहेर मनपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

चंद्रपूर शहरात नियमीत नालेसफाई होत नाही. नालेसफाई करीता अपुरा मनुष्य बळ आहे. त्यामूळे प्रभागात आठवड्यातून फक्त एकदाच नालेसफाई कामगार येत आहे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पथदिवे दुरुस्ती बंद आहे. शहर अंधारात आहे. पाणीपुरवठा अनियमित आहे, जागोजागी लिकेजस आहे दुरस्ती केल्या जात नाही. अमृत योजना कार्यान्वित झाली नाही अनेक दोष अमृत योजनेत आहे. मोकाट जनावरे, अतिक्रमण , रस्त्यावील खड्डे, दलीत वस्ती निधी, नगरोथान निधी याच्या वाटपात पारदर्शकता नाही आदी सर्व मुद्दे घेऊन मनसेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणुन यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मनपा उपायुक्त मंगेश खवले यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त यांच्या चेंबर मध्ये मनसे शहर अध्यक्ष सचिन भोयर व अन्य पदाधिकारी व सर्व मनपा विभाग प्रमुख यांची बैठक घेण्यात आली. चर्चा नागरी समस्यांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष मनसेने वेधले व निवेदन देण्यात आले व 15 दिवसात सर्व शहरातील नागरी समस्या सोडवू असे आश्वासन मनपा उपायुक्त यांनी दिले. यावेळी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मनदीप रोडे, कामगार जिल्हा अध्यक्ष नितीन भोयर, विधी विभाग जिल्हा अध्यक्ष मंजू लेडांगे,वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष महेश वासलवार, शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष आनंद बावणे, शहर पदाधिकारी, युनिऊन पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्यप्रमाणावर उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here