Home वरोरा खळबळजनक :- शेवटी उपकार्यकारी अभियंता भोयर एसीबीच्या जाळ्यात.

खळबळजनक :- शेवटी उपकार्यकारी अभियंता भोयर एसीबीच्या जाळ्यात.

२० हजारांची लाच घेतांना रंगेहात अटक, वरोरा येथे पाच वर्ष कमावली लाखोंची माया, गडचिरोली नाही साधला गेम.

वरोरा(गडचिरोली)प्रतिनिधी:-

काही महिन्यांपूर्वी वरोरा येथून बदली होऊन महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी मर्यादीत, आलापल्ली ता. अहेरी जिल्हा गडचिरोली येथे रुजू झालेले उप-कार्यकारी अभियंता (वर्ग-२) विनोदकुमार नामदेवराव भोयर, वय ४७ वर्षे यांना २० हजार रुपयांची लाच स्विकारताना अँटी करप्शन ब्युरो, गडचिरोलीच्या पथकाने आज दि. १७ ऑक्टोबर रोजी रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. वरोरा येथे अनेकांकडून पैसे घेऊन काम करणारे व पत्रकार राजकीय पुढाऱ्यांना गोड गोड बोलून स्वतःची पापे लपविणारे भोयर अखेर एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने वरोरा तालुक्यातील अनेकांनी आनंद साजरा केल्याची माहिती समोर येतं आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार यांना त्यांचे घरगुती मीटर फॉल्टी असल्याचे कारण सांगून गैरअर्जदार भोयर, उप-कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.क. मर्या. आलापल्ली यांनी अंदाजे २.२० लाख रुपये दंड भरावे लागेल, असे बोलून सदर दंडाची रक्कम कमी करुन ७३ हजार ६९८ रुपयांचा दंड केला व सदर दंडाची रक्कम कमी केल्याचा मोबदला म्हणून गैरअर्जदार भोयर यांनी ४० हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दिली.

पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांचे पर्यवेक्षणात पो. निरीक्षक शिवाजी राठोड यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा रचून कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना त्यांचे घरगुती मीटर फॉल्टी असल्याचे कारण सांगून गैरअर्जदार भोयर, उप-कार्यकारी अभियंता यांनी अंदाजे २.२० लाख रुपये दंड भरावे लागेल, असे बोलून सदर दंडाची रक्कम कमी करुन ७३ हजार ६९८ रुपयांचा दंड केला. सदर दंडाची रक्कम कमी केल्याचा मोबदला म्हणून ४० हजार रुपये लाच रक्कमेची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली व आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने सदर रक्कमेतील पहीला टप्पा रुपये २० हजार लाच स्विकारंताता रंगेहाथ मिळून आले. यावरुन गैरअर्जदार यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, अहेरी येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असून त्यांचे मौजा वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथील निवासस्थानांची अॅन्टी करप्शन ब्युरो, चंद्रपूर टीमकडून चौकशी सुरू आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. राहुल माकणीकर, अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पो.नि. शिवाजी राठोड, सफ़ौ सुनील पेददीवार, पोहवा नथ्थु धोटे, राजेश पदमगिरवार, पोशि किशोर ठाकुर, संदीप उडान सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली व चापोना विक्रमजीत सरकार, मोपवि गडचिरोली यांनी केलेली आहे.

Previous articleप्रस्ताव अंतिम टप्प्यात… दिक्षाभुमीचा विकास होणारच – आ. किशोर जोरगेवार
Next articleसोशल मीडियावर प्रचलीत मीम्स “जल्दी वहासे हटो व इलेक्ट्रॉनिक भोंग्याचा वापर करत मनसेचे अनोखे आंदोलन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here