Home चंद्रपूर दत्त नगर येथील सौंदर्य करण्याला महानगर पालिकेच्या आयुक्तांनी दिली भेट

दत्त नगर येथील सौंदर्य करण्याला महानगर पालिकेच्या आयुक्तांनी दिली भेट

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  दर वर्षी महानगर पालिका चंद्रपूर चा वतीने पर्यावरण पूरक गणेश मंडळ स्पर्धा आयोजित केली जाते. त्या अनुषंगाने मागील तीन वर्षा पासून श्री नवयुक बाल गणेश मंडळ, दत्त नगर, नागपूर रोड, चंद्रपूर या स्पर्धेत प्रथम क्रमांक घेत आलेला आहे. या वर्षी सुद्धा महानगर पालिकेच्या वतीने गणेश मंडळ साठी होत असलेल्या स्पर्धेत भाग घेतला असून

त्याचाच एक भाग म्हणून दत्त नगर, नागपूर रोड, चंद्रपूर येथे टाकावू पासून टिकवू व सौंदरिकरन करणे हा सुध्दा स्पर्धेचा एक भाग होता. या साठी गणेश मंडळ ने दत्त नगर येथील घराचा भिंती रंगवून विविध सामाजिक संदेश दिले, तसेच टाकावू वस्तू पासून जसे टायर पासून मच्छी, सूर्य, झेब्रा, टेबल अशा वस्तू तयार केल्या त्या सोबतच लाकडापासून ढोलकी, माणूस तसेच पाणी पडणारा धबधबा, कारंजा , वाघाची गृहा, अस्वलाची गृहा, पक्षासाठी घरटे, पाण्याची सुविधा अश्या विविध गोष्टी तयार करण्यात आल्या आहे.

या सर्व गोष्टींची पाहणी करण्यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेचे मा. आयुक्त विपीनजी पालीवाल यांनी भेट दिली व या सर्व बाबीची माहिती जाणून घेवून मंडळ सदस्याचे कौतुक केले. हा सुंदर असा परिसर पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणत येवून मंडळ कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत आहे

Previous articleदत्त नगर येथील शारदा महिला मंडळ चा सुंदर देखावा
Next articleलखबिर सिंग लक्खा यांच्या भक्तीगीतात चंद्रपूरकर तल्लीन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here