Home चंद्रपूर दत्त नगर येथील शारदा महिला मंडळ चा सुंदर देखावा

दत्त नगर येथील शारदा महिला मंडळ चा सुंदर देखावा

अतुल दिघाडे
जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर  :-  सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे व सगळीकडे अतिशय भक्तिमय वातावरणात आदी शक्तीची आराधना सुरू आहे या वर्षी या आदी शक्तीची आराधना करताना दत्त नगर, नागपूर रोड, चंद्रपूर येथील शारदा महिला मंडळ ने या शक्तीचा एक आगळा वेगळा देखावा तयार केला असून गृहलक्ष्मी चा स्वरूपात शारदे ची स्थापना करण्यात आली आहे.

प्रत्येक घरची लक्ष्मी घरा बाहेरचा जबाबदारी पार पाडत असताना घरी सुद्धा आपले कार्य योग्य प्रकारे पार पाडत असते स्त्री शक्तीची हीच ओळख देखाव्यात साकारण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे या देखाव्यात घरात असलेली तुळशी ही समृध्दी व आरोग्याचे प्रतीक असते

तुळशीची रोज पुजा केली जाते ही पूजा करताना आदी शक्तीचा एक रूपाचा ओळख या देखाव्यात सादर करताना शारदा माता तुळशीला पाणी टाकून पूजा करताना दिसत असून त्यांसोबतच आपल्या घरी असलेल्या जुन्या वस्तू ज्या आज आपण विसरत चाललो आहे. असे जात, वरवंटा, सूप मडकी, चूल खाट, वाकळ अशा विविध वस्तू दाखवून या वास्तूची ओळख नवीन पिढीला करून देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक येत आहे.

Previous articleब्रेकिंग :- अभियंत्यांच्या त्रासाला कंटाळून महावितरण कर्मचारी यांची आत्महत्या.
Next articleदत्त नगर येथील सौंदर्य करण्याला महानगर पालिकेच्या आयुक्तांनी दिली भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here