Home चंद्रपूर डॉ.अशोक जिवतोडे यांना मिळणार भाजपची चंद्रपूर लोकसभा उमेदवारी ?

डॉ.अशोक जिवतोडे यांना मिळणार भाजपची चंद्रपूर लोकसभा उमेदवारी ?

कुणबी चेहरा न दिल्यास भाजपला ही जागा मिळविणे अवघड. म्हणून भाजपला द्यावी लागणार उमेदवारी ?

चंद्रपूर(राजकीय वेध):-

महाराष्ट्रात काँग्रेसला सन 2019 ला लोकसभा निवडणुकीत एकमेव जागा राखता आली ती म्हणजे चंद्रपूर-वणी-आर्णी, या लोकसभा क्षेत्रात ऐन वेळेवर शिवसेनेतून काँग्रेस मध्ये आलेले तत्कालीन शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेस कडून उमेदवारी लढवली व जनतेने त्यांना कुणबी चेहरा म्हणून मोठ्या फरकाने निवडून दिले. दरम्यान या लोकसभा क्षेत्रात भाजप ने 2019 च्या निवडणुकी आधी पक्षाअंतर्गत जो सर्व्हे केला होता त्यात विदर्भात भाजप ला चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात जिंकने कठीण जाईल असा अहवाल होता, व एबीपी माझाने ती बातमी सुद्धा दाखवली होती. कारण नेहमी नेहमी अल्पसंख्यांक असलेल्या हंसराज अहिर यांना उमेदवारी मिळते तर मग बहुसंख्यांक असलेल्या कुणबी किंव्हा स्थानिक ओबीसी उमेदवाराला का भाजप उमेदवारी देत नाही हा रोष पक्षातील कार्यकर्त्यांत होता, त्यामुळे या लोकसभा क्षेत्रात कुणबी फॅक्टर महत्वाचा राहणार होता. पण भाजपने त्याकडे डोळेझाक केली आणि शेवटी हंसराज अहिर यांनाच लोकसभा उमेदवारी मिळाली. त्यावेळी त्यांचा 44 हजार 763 मतांनी काँग्रेस चे बाळू धानोरकर यांच्याकडून पराभव झाला, ती खंत आजही भाजप श्रेष्ठीना असावी व त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे असे वाटते, दरम्यान देशात भाजप विरोधात जे वातावरण आहे ते पाहता चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत भाजपला कुणबी व्यक्तीचं मैदानात उतरावा लागेल अन्यथा ही लोकसभा भाजप ला जिंकताचं येणार नाही ही सध्याची राजकीय परिस्थिती दिसत आहे.

जिल्ह्यात डॉ. अशोक जीवतोडे हे विदर्भ आंदोलन व ओबीसी आंदोलन चळवळीत सक्रिय आहेत, ते राजकारणी म्हणून कधीही समोर आले नाही पण ओबीसी चळवळीतून ते पुढे आले आहे आणि सध्या ते भाजपमध्ये आहे, त्यामुळे साम दाम दंड भेद या चारही आयुधाचा वापर करून व कुणबी समाजाचे संख्याबळ पाहता ते भाजप ने उमेदवारी दिल्यास निवडून येऊ शकतात व भाजप चंद्रपूर लोकसभेच्या या जागेवर पुन्हा कब्जा करू शकते. दरम्यान देशात लोकसभा काबीज करण्यासाठी काही भाजप च्या मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्याची भाजपाची रणनीती असल्याची चर्चा आहे व त्यात चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात असेल याबद्दल पण चर्चा सुरू आहे, पण मराठा विरोधात ओबीसी आरक्षणाचा विषय राज्यात पेटला असतांना अल्पसंख्याक उमेदवार लोकसभेच्या लढाईत टिकणार नाही असा सूर उमटत आहे व हा अंदाज भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना असू शकतो, त्यातच हंसराज अहिर यांना अगोदरच केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष केल्याने त्यांना लोकसभा लढवणे भाजप ला महागात जावू शकते, त्यामुळे डॉ अशोक जिवतोडे हेच खरे भाजप चे लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून पुढे येईल असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे

डॉ.अशोक जिवतोडे यांच्या जमेच्या बाजू.

डॉ. जिवतोडे हे नेहमीच विदर्भ राज्य व्हावे या मागणीसाठी आग्रही आहे. त्यासाठी त्यांनी शासनाकडे पत्र-व्यवहार, निवेदने दिली तर आंदोलने, धरणे, रास्ता रोको, मोर्चा, बैठका, अधिवेशने घेऊन विदर्भाच्या चळवळीची शस्त्रे उगारली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर ओबीसी आंदोलनात सुद्धा ते अग्रेसर होते व त्यांच्या नेत्रुत्वात ८ डिसेंबर २०१६ ला नागपूर येथील अधिवेशनावर काढलेला ओबीसी समाजाचा भव्य ‘न भूतो, न भविष्यति, असा मोर्चा काढला होता. तो ओबीसी आंदोलनातील महत्त्वाचा टप्पा ठरला व या मोर्चाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली. हे या आंदोलनाचे फलित म्हणावे लागेल. देशभरातील विविध राज्यांत देशव्यापी अधिवेशनाच्या माध्यमातून ओबीसी चळवळीला मजबूत करण्याचे काम आजही डॉ. जिवतोडे यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे कुणबी फॅक्टर व ओबीसी आंदोलनाचा चेहरा अशी जमेची बाजू असलेल्या डॉ जिवतोडे यांना त्यांच्या  कार्याची दखल भाजप निश्चितपणे घेईल व त्यांना चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देईल असे संकेत मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here