Home चंद्रपूर धक्कादायक :- जेष्ठ पत्रकार नथमल सोनी यांचे पुत्र मुकेश यांचे दुःखद निधन.

धक्कादायक :- जेष्ठ पत्रकार नथमल सोनी यांचे पुत्र मुकेश यांचे दुःखद निधन.

अवघ्या 37 वर्षात घेतला जगाचा निरोप. सोनी परिवारावर पसरली शोककळा.

चंद्रपूर :-

जिल्ह्यातील महाराष्ट्र खबर या साप्ताहिक वर्तमानपत्रांचे संपादक तथा जेष्ठ पत्रकार नथमल सोनी उर्फ नथमल सारडीवाल यांचे जेष्ठ पुत्र मुकेश यांचे काल रात्री 9.00 च्या सुमारास दुःखद निधन झाले. अवघ्या 37 वर्षात तरुण मुलगा गेल्याने सोनी परिवारावर दुःखाचा जणू डोंगर कोसळला की काय अशी विदारक परिस्थिती झाली आहे.

चंद्रपूर येथील अंचलेश्वर गेट जवळ राहणारे महाराष्ट्र खबर साप्ताहिक चे संपादक यांनी आपल्यां धारदार लेखणीने शासन प्रशासनास घाम फोडला होता परंतु आता वाढत्या वयात त्यांच्याकडून पत्रकारिता जास्त प्रमाणात होत॑ नव्हती दरम्यान मुकेश काही प्रमाणात त्यांचे काम सांभाळायचा पण काल आकस्मिकरीत्या त्यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता पसरताच पत्रकारिता क्षेत्रात शोक व्यक्त केल्या जातं आहे. उद्या त्यांच्या अंचलेश्वर गेट जवळील घरातून सकाळी 11.00 वाजता अंत्ययात्रा निघून मोक्षधाम येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here