Home वरोरा राजकीय कट्टा :- डॉ.अनिल बुजोने यांनी संयम पाळला असता तर धानोरकरांचा उदय...

राजकीय कट्टा :- डॉ.अनिल बुजोने यांनी संयम पाळला असता तर धानोरकरांचा उदय झाला नसता.

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात सर्वात लढवय्या नेता म्हणजे डॉ. अनिल बुजोने.

राजकीय कट्टा :-

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात आपल्यां राजकीय संघर्षाने मैदान गाजविणाऱ्या डॉ. अनिल बुजोने या लढवय्या नेत्यांचा पूर्व इतिहास बघता आज त्यांच्या एवढा राजकीय द्रुष्ट्या प्रगल्भ नेता या विधानसभा क्षेत्रात दुसरा दिसत नाही, परंतु त्यांनी एक चूक केली आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले. शिवसेनेला वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात खरी उभारी बुजोने यांच्या कार्यकाळातच मिळाली, कारण त्यांनी या दोन तालुक्यात पदयात्रा काढून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या सर्व शिवसैनिकांना एकत्र करून शिवसेनेची मोट बांधली होती. आणि संजय देवतळे यांच्यापुढे त्यांनी तगडे आव्हान उभे केले होते. दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर डांगे यांनी सन 2004 मध्ये स्वतःला उमेदवारी मागितली व बुजोने यांना अपक्ष निवडणूक लढावी लागली तरीही त्यांनी तब्बल 42 हजार पेक्षा जास्त मतदान घेऊन किशोर डांगे यांची जमानत जप्त केली होती. त्यावेळी जर डॉ. बुजोने यांनी संयम पाळला असता तर शिवसेना त्यांच्या कब्जात असती व तेच या क्षेत्राचे नेते असते व पुढील काळात आमदार झाले असते एवढी चांगली संधी होती पण त्यांनी नंतर शिवसेना सोडली आणि त्याच काळात बाळू धानोरकर यांना उपजिल्हा प्रमुख पद मिळालं नंतर जिल्हाप्रमुख पद आणि त्यानंतर त्यांनी 2009 ची निवडणूक लढली ती हरली पण 2014 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. जर डॉ. बुजोने यांनी संयम पाळला असता तर बाळू धानोरकर यांचा राजकीय उदय झाला नसता व ते आमदार खासदार म्हणून राजकीय पटलावर दिसले नसते एवढे मात्र नक्की.

डॉ. बुजोने हे ब्राम्हण जरी असले तरी त्यांचे विविध जातीचे कार्यकर्ते कधी त्यांच्याकडून तुटले नाही. कार्यकर्त्यांचे कुठलेही काम असो डॉ. बुजोने हे नेहमी त्यांना सहकार्य करायचे. त्यांनी 2004, 2009 अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली तर 2014 मध्ये त्यांनी मनसे कडून निवडणूक लढवली परंतु त्यांना विजय प्राप्त होऊ शकला नाही ही खरे तर त्यांच्या राजकीय निर्णयाची चूक होती, त्यांनी किशोर डांगे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली तेंव्हा संयम पाळला असता व पक्षात राहूनच त्यांनी गनिमी कावा करून किशोर डांगे यांच्यावर मात करायला हवी होती व नंतर संधी साधून राजकीय कारकीर्द गाजवायला हवी होती पण त्यांचा संयम ढळला आणि त्यांची राजकीय कारकीर्द इतिहास जमा झाली.

डॉ. बुजोने यांनी पुन्हा केली चूक.

अपक्ष निवडणूक लढवून यश मिळतं नाही याचा साक्षात्कार झाल्यानंतर डॉ. बुजोने यांनी 2014 मध्ये मनसे कडून निवडणूक लढवली. दरम्यान राज्यात भाजप सेना युती तुटली होती व भाजप शिवसेना उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यात काँग्रेस ची उमेदवारी मिळाली नाही म्हणून संजय देवतळे हे भाजप कडून लढले तर शिवसेनेकडून बाळू धानोरकर व काँग्रेस कडून डॉ. आसावरी देवतळे उभे होते त्यामुळे मनसे कडून उमेदवारी लढविणाऱ्या डॉ. अनिल बुजोने यांना जातीय समीकरणाचा फटका बसून त्यांना आपली जमानत वाचविता आली नाही. पण त्यांनी मनसे मध्येच राहून पुन्हा पक्ष बांधणी आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले कार्य सुरू ठेवले असते तर मागील निवडणुकीत मनसेचे एकमेव उमेदवार विदर्भातून निवडून आले असते एवढी संधी त्यांना मिळाली होती पण मनसेतुन भाजप मध्ये ते गेले आणि त्यांची संधी हुकली.

भाजप मधून त्यांनाच उमेदवारी मिळणार?

डॉ. अनिल बुजोने यांच्या एवढा जमिनी स्तरावरचा लढवय्या नेता, उत्कृष्ट वक्ता व संघटक आजही या क्षेत्रात भाजपकडे नाही. कारण आज त्यांनी आपले कार्यक्रम व उपक्रम राबविण्याचा सपाटा जर लावला तर त्यांचे या क्षेत्रातील कार्यकर्ते आज त्यांच्या पाठीशी उभे राहू शकतात. सोबतच त्यांचे भाजप च्या वरिष्ठांशी चांगले संबंध आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांकडून त्यांची उमेदवारीसाठी शिफारस होऊ शकते, त्यामुळे भाजपची उमेदवारी डॉ अनिल बुजोने यांना मिळू शकते यात शंका नाही पण सध्याच्या राज्यातील महायुतीत (भाजप सेना व राष्ट्रवादी) भाजप च्या वाट्याला हा मतदारसंघ येण्याची शक्यता फार कमी असल्याने आता सुद्धा त्यांना संधी मिळेल का याबाबत प्रश्नच आहे. असो, आज दिनांक 23 ऑक्टोंबरला डॉ अनिल बुजोने यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा !…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here