Home चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभाग “आकाश बार”चा परवाना रद्द करणार का?

राज्य उत्पादन शुल्क विभाग “आकाश बार”चा परवाना रद्द करणार का?

अधीक्षक संजय पाटील यांची भूमिका संदिग्ध. यांच्या काळातील दारू परवाने वादात.

चंद्रपूर :-

वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील “आकाश बार” चा परवाना हा बेकायदेशिर असुन तत्कालीन काही महिलांनी या बार ला रेस्टोरंट चा परवाना मिळू नये म्हणून सामूहिक आंदोलनाचा इशारा दिला होता व तेथील एका ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार करून रेस्टोरंट बनू नये व त्यानंतर बार चा परवाना देऊ नये अशी तक्रार तहसीलदार यांच्याकडे दिली होती पण अवैध दारू विक्रीचा व्यवसाय असणाऱ्या या बार चा मालक अंजनेयेलु याला बनावट कागदपत्रांच्या आधारे सन 2011-12 च्या कालावधीत आकाश बार चा परवाना देण्यात आला. दरम्यान दारूबंदी सन 2015 मध्ये झाल्यानंतर व कोराना च्या काळात त्याने कोट्यावधी रुपयांची अवैध दारू विकली व आता सुद्धा वरोरा येथील बोर्डा चौकात देशी दारू भट्टी किरायाने घेऊन तिथून व आकाश बार मधून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू च्या पेट्या होलसेल भावाने तो विकत आहे. सन 2021 मध्ये जिल्ह्यात दारूबंदी हटल्या नंतर त्यांनी आकाश बार चे नूतनीकरण करतांना स्वयंघोषणापत्र देतांना लिखित दिले की माझ्या विरोधात कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल नाही व असल्यास माझा परवाना रद्द करण्याच्या कारवाईस मी पात्र असेन, पण आश्चर्याची बाब म्हणजे स्वतः राज्य उत्पादन शुल्क विभागाने या आकाश बार मालकांवर अवैध दारू विक्री प्रकरणी कारवाई केल्यानंतर त्याच विभागाने त्यांचे स्वयंघोषणापत्र ग्राह्य मानले, यापेक्षा कुठली डोळेझाक असेल. या संदर्भात मनसे तर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्याकडे तक्रार केली असता मागील सहा महिन्यांपासून त्यांनी आकाश बार वर कुठलीही कारवाई केली नाही.

जिल्ह्यात सगळीकडे दारूचा महापूर आला असुन गल्लोगल्ली बिअर शॉपी, बिअर बार व देशी भट्टी मध्ये लोकांचा जमावडा जणू सामाजिक आरोग्य बिघडल्याचे संकेत देत आहे. दरम्यान जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बिअर शॉपी व बिअर बार चे परवाने असे वाटप केले की जसा आपण एखाद्या कार्यक्रमात महाप्रसाद वाटप करत आहो. एका बिअर बार नंतर दुसरा बिअर बार चे अंतर किती असावे किंव्हा एका बिअर शॉपी नंतर दुसरी बिअर शॉपी चे अंतर किती असावे यांची काहीएक दखल न घेता मागेल त्याला बिअर बार आणि त्यांच्याकडून लाखोंची लाच घेतल्याची चर्चा आहे. जवळपास शंभराच्या वर बिअर बार आणि तितक्याच बिअर शॉपी चे परवाने वाटप करतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका लिपिकापासून तर अधीक्षक यांच्यापर्यंत परवाने मिळविण्यासाठी कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली असुन या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अधीक्षक संजय पाटील यांना निवेदन देऊन आपल्यां विभागात होणाऱ्या भ्रष्टाचार व आम्ही लावलेल्या आरोपांचे लेखी उत्तर द्या अन्यथा आम्ही पुराव्यासह आपल्या विभागावर मनसे स्टाईल मोर्चा काढू असा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here