Home चंद्रपूर समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा माणुसकी ग्रुप चंद्रपूर

समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा माणुसकी ग्रुप चंद्रपूर

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपुरातील माणुसकी ग्रुप तर्फे पुन्हा एका बेसहारा व्यक्तीची मदत

 चंद्रपूर  :-  दिनांक २७,१०,२०२३ ला जटपुरा गेट रामनगर रोड परिसरात एक बेसहारा मनोरुग्ण वक्ती एक पाय तुटलेल्या अवस्थेत आणि त्यांच्या दुसऱ्या पायाला दुखापत होऊन त्याच्या पायाला किडे लागलेले होते. दुखापती मुळे तो खूप जोर जोरात चीलावत होता असे या परिसरातील लोक सांगत होते. हे बगून येथील असलेल्या साईप्रीत चक्कनीपवार यांनी मानुसकी ग्रुप मधील सुशांत धकाते याला फोन करून माहिती दिली.

पण तो त्यावेळेस बल्लारशाला असताना त्याने तुरंत मानुसकी ग्रुपमधील विशाल रामगिरवार यांना कॉल केला. आणि तिथं लवकरात लवकर पोहोचायला सांगितले. विशाल रामगिरीवार यांनी कोणतीही वेळ वाया न घालता तिथे पोहचला व त्या जखमी व्यक्तीचे दुर्दशा आणि दुखापत बघून विशाल याने तात्काळ प्रायव्हेट ॲम्बुलन्स बोलावून त्या वक्तीला तिथून उचलून रेस्क्यू करण्यास सुरुवात केली. आणि सरकारी हॉस्पिटल मध्ये असलेले डॉक्टर झलके यांना फोन लावला त्यांनी सुद्ध माणुसकी ग्रुपला सांगितले की तुम्ही त्याला लवकरात लवकर सरकारी दवाखान्यात भरती करा बाकी सगळी प्रोसेस मी बघतो.

नंतर डॉक्टरांच्या सल्ला घेऊन त्याला सरकारी दवाखान्यात भरती करून त्याच्यावर पुढील ट्रीटमेंट सुरू करण्यात आली. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट व प्रोसेस करण्यात आली आणि त्यांच्या परिवारास शोध घेण्याकरिता पोलीस चौकी ला सांगण्यात आले. या कामांमध्ये माणुसकी ग्रुपला सायप्रीत चक्कन्नीपवार, पार्श्वव खाजांची यांची मदत मिळाली. त्यावेळेस माणुसकी ग्रुप मधील. सुशांत धकाते, विशाल रामगिरवार विनोद पेनलीवार, जास्मिन शेख उपस्थित होते.

🙏🏻 समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा  🙏🏻 एक हाथ मदतीचा 

         माणुसकी ग्रुपचा चंद्रपुरातील नागरिकांना संदेश

तुम्हाला तुमच्या परिवारातील किव्हा मित्र परिवारातील तुमच्या स्वतःच्या वाढदिवस कोणत्याही प्रकारचे शुभ मुहुरत सामाजिक उपक्रमा प्रकारे करायचे असेल तर माणुसकी ग्रुपशी संपर्क करा समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा.

Previous articleअनधिकृत ले आऊट वरील बांधकामावर मनपाची कारवाई
Next articleक्राईम :- चंद्रपूर मे वर्ल्डकप क्रिकेट सट्टा किंग क्यों नहीं पकडा जा रहा है?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here