Home चंद्रपूर दिव्यांग मुलांच्या आरोग्याशी व कर्मचाऱ्यांना छळणाऱ्या संस्था चालकांवर कारवाई करा.

दिव्यांग मुलांच्या आरोग्याशी व कर्मचाऱ्यांना छळणाऱ्या संस्था चालकांवर कारवाई करा.

मनसे जनहित कक्ष विभागाकडून दिव्यांग आयुक्तांकडे मागणी.

चंद्रपूर :-

चंद्रपूर तालुक्यातील टाडाळी परिसरातील श्री साई मतिमंद शिक्षण संस्था, चंद्रपूर अंतर्गत स्विकार दुर्बल मनरक (मतिमंद दिव्यांग) मुलांच्या निवासी शाळेची अव्यवस्था बघता व तेथील दिव्यांग मुलांच्या आरोग्याची छळ चालू असुन कर्मचाऱ्यांचा सुद्धा संस्थाचालक यांच्याकडून मानसिक त्रास देणे सुरू असल्याने संस्थाचालक यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्या शाळेवर प्रशासक बसविण्यात यावं व शाळा संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी मनसे जनहित कक्ष विभागाकडून राज्याचे दिव्यांग आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.

श्री साई मतिमंद शिक्षण संस्था, चंद्रपूर अंतर्गत स्विकार दुर्बल मनरक (मतिमंद, दिव्यांग) मुलांची निवासी शाळा ताडाळी (तालुका जिल्हा चंद्रपूर) सुरु आहे. या संस्थेचे सचिव रेखाताई मो. पिंपळशेडे ह्या असुन संस्थेच अध्यक्ष नितीन गोरेश्वर पिंपळशेंडे हे आहे. या शाळेत जवळपास 30 दिव्यांग (मतिमंद) मुलं शिक्षण घेतात पण ताडाळी परिसरातील जंगली भागात असलेल्या या शाळेला संरक्षण भिंत नाही. त्यामुळे साप, विंचू, सोबतच वाघांची पण भीती आहे. येथील इमारतीला भेगा पाडल्या असुन शौचालय व बाथरूम सुद्धा व्यवस्थित नाही, त्यांना व्यवस्थित दरवाजे नाही खिडक्या पण नाही आणि स्वयंपाक खोलीला पण भेगा पडलेल्या आहे, त्यामुळे ही शाळा समाजकल्याण विभागाच्या निकषात बसत नसतांना समाजकल्याण अधिकारी या संस्थेची पाठराखण करून येथील दिव्यांग मतिमंद मुलांचे शोषण करत आहे व येथील कर्मचाऱ्यांवर दहशत ठेऊन त्यांचा मानसिक छळ सुरू आहे. या शाळेला कुठल्याही सोयीसुविधा नसून येथील कर्मचाऱ्यांच्या पगारावर व सामाजिक भावनेने दिलेल्या देणगीवर ही शाळा चालवली जात आहे आहे व शासनाचे अनुदान संस्थाचालक स्वतः कडे ठेवत आहे. बहुदा महाराष्ट्रातील ही पहिली अशी शाळा असेल जिथे कर्माच्याऱ्यांच्या पैशावर शाळा चालवली जात आहे, परंतु तरीही संस्थाचालक यांच्याकडून कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पैशाची मागणी करत असुन पैसे दिले नाही म्हणून कर्मचाऱ्याना मानसिक त्रास देणे सुरू आहे.

या शाळेत जे 16 कमर्चा-यांची नियुक्ती करण्यात आली त्या कर्मचाऱ्यांच्या पैशांतून दिव्यांग विद्यार्थ्यांचे जेवण व इतर सुविधा दिल्या जातं आहे व शासनाकडून येणारे अनुदान आणि देणगी ही संस्थाचालक स्वतःसाठी खर्च करत आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांवर कर्मचारी आपल्या पगारातून खर्च करत असतांना संस्थाचालक पुन्हा अतिरिक्त पैशांसाठी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देत आहे, त्यांना कारणे दाखवा नोटीस देणे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना घरचे वयक्तिक काम सांगणे व न केल्यास त्यांना मारहाण करणे, त्या कर्मचाऱ्यांना निलंबनाचा नोटीस देणे, शाळेला मिळालेले अनुदान स्वतः लाटणे. संस्थाचालक स्वतः संस्थेच्या बैंक खात्यातून पैसे खर्च करत नसल्याने शासनाकडे खोटे व बनावट बिले सादर करून अनुदान लाटणे. जिल्ह्यातील कंपन्यांतून मिळालेल्या सीएसआर फंडाचा पैसा स्वतःकडेच ठेऊन संस्थेच्या इमारतीची दुरुस्ती न करणे, कर्मचाऱ्यांना नौकरितुन काढून टाकण्याची धमकी वारंवार देणे, त्यांच्याकडून 16-16 तास काम करून घेणे. अर्वाच्य भाषेत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून निलंबनाची कारवाई करण्याची नोटीस देणे, असाच एक प्रकार चतुर्थ श्रेणी कर्मचारी राजु मलोडे यांना घरचे भांडे घासत नाही या कारणावरून त्याला मारहाण केली व त्याचा निलंबनाचा नोटीस काढला आहे. माहे जुलै 2023 पासून कर्मचाऱ्यांचे वेतन जाणीवपूर्वक थकीत ठेवले आहे. खासदार निधीतून बांधलेल्या वर्ग खोल्यांत स्वतः संस्थाचालक आपले कार्यालय खोलुन आहे व वसतिगृह जिथे पूर्णतः दुभंगलेल्या इमारतीत शाळां भरवत आहे.

संस्थेच्या या शाळेची दुर्दशा झाली आहे व दिव्यांग मुलांची एक प्रकारे छळवणूक व कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत॑ आहे. या संदर्भात शाळेच्या कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या सचिव व अध्यक्ष यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे परंतु संस्थेच्या सचिव व अध्यक्षांवर कारवाई झाली नसल्याने त्यांच्याकडून बिचाऱ्या दिव्यांग मुलांना योग्य ते शिक्षण व भोजन मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे दिव्यांग आयुक्तांनी त्वरित चौकशी करून त्या शाळेत प्रशासक नेमावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण जनहित सेनेकडून समाजकल्याण जिल्हापरिषद समाजकल्याण विभागाविरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषद घेऊन देण्यात आला आहे. यावेळी मनसे जनहित कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुडे व मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे उपस्थित होते.

Previous articleदखलपात्र :- बोर्डा ग्रामपंचायत सरपंच विरोधात ग्रा. पं. सदस्य एकवटले.
Next articleअखेर सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here