Home वरोरा दखलपात्र :- बोर्डा ग्रामपंचायत सरपंच विरोधात ग्रा. पं. सदस्य एकवटले.

दखलपात्र :- बोर्डा ग्रामपंचायत सरपंच विरोधात ग्रा. पं. सदस्य एकवटले.

मागील मासिक सभेतील ठरावातील प्रश्न जर सोडवल्या जातं नसेल तर मग मासिक सभा कशाला? सदस्यांचा सरपंचांना सवाल.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत मध्ये एक असलेली महत्वपूर्ण बोर्डा ग्रामपंचायतच्या महिला सरपंच यांच्या विरोधात उपसरपंच यांच्यासह जवळपास 8 ग्रामपंचायत सदस्य यांनी दिनांक 30 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या मासिक सभेवर बहिष्कार टाकून सरपंच यांच्या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध केला असल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान 13 ग्रामपंचायत सदस्या पैकी 8 ग्रामपंचायत सदस्य विरोधात गेल्याने महिला सरपंच अल्पमतात आल्या आहे. ग्रामपंचायत उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांचा आरोप आहे की मागील मासिक सभेतील ठरावातील प्रश्न जर सोडवल्या जातं नसेल तर मग मासिक सभा कशाला पाहिजे ? आधी मागील सभेतील ठरावाच्या अनुषंगाने गावांतील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण कसे झाले याचा इतिवृत्तांत वाचून दाखवला पाहिजे तरच पुढील ठराव घेतले गेले पाहिजे, पण मागील सभेच्या ठरवतील मुद्दे तसेच अनिर्णीत राहत असेल तर मासिक सभा आयोजित कशाला करायची ? असा सवाल ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच व सचिवाला केला आहे आणि मासिक सभेवर बहिष्कार टाकला आहे.

बोर्डा ग्रामपंचायत ही तशी श्रीमंत ग्रामपंचायत आहे पण इथे भ्रष्टाचाराची वाळवी लागली आणि नागरिकांच्या समस्या आ बसून उभ्या राहिल्या. खरं तर सर्वात मोठा महसूल घर टॅक्स व पाणी टॅक्स यापासून ग्रामपंचायत ला मिळतो सोबतच बांधकाम परवानगी मध्ये सुद्धा इथे पैसे मिळतात पण गावाचा विकास साधायला लोकप्रतिनिधी यांची राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, पण त्याचा अभाव असल्याने एवढा मोठा गांव जो शहराची बरोबरी करू शकतो तो गांव समस्यांनी वेढला असल्याचे मत ग्रामस्थांचे आहे. या ग्रामपंचायत ला सुर्ला हा छोटासा गांव जोडला आहे पण तिथे सुद्धा भौतिक सुविधा मिळतं नसल्याची ओरड होत आहे

बोर्डा ग्रामपंचायत च्या पाणी पुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले की वाजवले याचा गुंता अजून सुटला नसतांना व ग्रामपंचायत इमारतींची दुरवस्था बघता या गावात काय चांगलं काम झालं असेल यांची प्रचिती येते अशातच आता ग्रामपंचायत सरपंच यांच्यावर जर ग्रामपंचायत सदस्य आरोप करत असतील तर या गावातील सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल हा प्रश्न निर्माण होत॑ आहे. दरम्यान ज्या पैनेल कडून सदस्य निवडून आले त्या पैनेल च्या सरपंच यांना विरोध होत॑ आहे म्हणजे सत्तेचं गणितं फिरलं असावं आणि कुठंतरी नवीन राजकीय समीकरण जुळून सरपंच यांना पायउतार करण्याचा प्लान तर झाला असावा अशी शंका निर्माण होत॑ आहे. पण सरपंच यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच आपले कामकाज करावे ही सर्वांचीच अपेक्षा असते ती सार्थ आहे आणि म्हणूनच बोर्डा ग्रामपंचायतचे उपसरपंच राहुल ठेंगणे यांच्यासह आ.मु.वानखेडे र.म. देसाई, प्री. वी. भोयर, पं. अ. r जिवतोडे, भा. ल. इंगळे, गो. मो. परचाके, नंदा. बा. हीवरकर यांनी ग्रामपंचायत च्या मासिक सभेवर बहिष्कार टाकला आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here