Home चंद्रपूर चंद्रपुरातील माणुसकी ग्रुपच्या संदेशच्या होत आहे फायदा सोहन रामगीरवार यांची मुलगी अद्विका...

चंद्रपुरातील माणुसकी ग्रुपच्या संदेशच्या होत आहे फायदा सोहन रामगीरवार यांची मुलगी अद्विका रामगीरवार चा वाढदिवस मुकबधीर वसतिगृहत साजरा

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  आज दी.२९,१०,२०२३ ला मूकबधिर वसतिगृह बाबुपेठ येथिल मुलामुलीसोबत सोहन रामगीरवार व रविना रामगीरवार यांची मुलगी अद्विका रामगीरवार ईचा वाढदिवस मुकबधीर वसतिग्रूह बाबुपेठ चंद्रपूर येथिल मूकबधिर मुलामुलींनसोबत साजरा करण्यात आला.

या उपक्रमामुळे वसतिगृहातील मूल व मुली अतिशय आनंदी झाले.त्यानंच्या चेहऱ्या वरचा आनंद बघून माणुसकी ग्रुपच्या सर्व सदस्यांना सुद्धा खूप आनंद झाला. माणुसकी ग्रुप त्या मुलामुलीनं सोबत रमून गेले आणि त्यांच्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधान्याच्या प्रयत्न करत होते.

त्यांची इच्छाशक्ती बघून सर्व सदस्यांना खूप विचार पडत होता की मूकबधिर असून सुद्धा यांच्यात इतकी इच्छाशक्ती आणि जिद्द कशी काय यांची जिद्द आणि इच्छाशक्ती बघून माणुसकी ग्रुप मधील सर्वांचे मन भरून आले होते. तरी सर्वांनी स्वतःला सांभाळून त्यांच्याशी खूप चांगल्या पद्धतीने व हसत खुशीत कार्यक्रम पार पाडला

व त्यांच्यासोबत या कार्यक्रमात सोहन रामगीरवार व रविना रामगीरवार यांच्या कडून फळे आणि चिप्स पॅकेट मुलांना देण्यात आले. यावेळेस माणुसकी ग्रुपचे विशाल रामगिरवार विनोद पेन्लीवार, सुशांत धकाते, सारिका टेंभरे, प्रणय रायपुरे, करण अक्कुलवार, अश्विन वांढरे, विनू पचारे, व बाकी सर्व सदस्य उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडला व या कार्यक्रमात विशेष सहकार्य जयश वराळे, कालिदास बल्की, वैरागडे, कानकाटे, याचे सहकार्य लाभले.

 

           माणुसकी ग्रुपच्या नागरिकांना संदेश

सगळ्यांनी आपले वाढदिवस अश्याच गोर गरीब मुकबधीर मुलांसोबत साजरा करायला पाहिजे जेणेकरून सगळ्या छोट्या मूकबधिर मुलांना ही आनंद मिळणार.🙏

     टिप :-

तुमच्या पैकी जर कोणाला असाच आपला वाढदिवस, किंवा कोणतेही आनंदाचा क्षण गोरगरीब मुकबधीर मुलांसोबात साजरा करण्याची इच्छा असल्यास माणुसकी ग्रूप शी संपर्क साधावा. मो-8055407941/8999645084

Previous articleलक्षवेधी :- शिंदे-फडणवीस सरकार खरंच मराठ्यांना आरक्षण देऊ शकेल का?
Next articleदखलपात्र :- बोर्डा ग्रामपंचायत सरपंच विरोधात ग्रा. पं. सदस्य एकवटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here