Home चंद्रपूर धक्कादायक :-सिटीपीएस द्वारे लावलेली ४० हजार झाडे का मेली ?

धक्कादायक :-सिटीपीएस द्वारे लावलेली ४० हजार झाडे का मेली ?

कंत्राटदारांने कंपनीच्या अभियंत्याला धरले जबाबदार. जर सुविधा करून दिली असती तर झाडे वाचली असती.

चंद्रपूर :-

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात भ्रष्टाचार म्हणजे जणू शिष्टाचार झाला की काय अशीच परिस्थिती दिसत असुन येथे परंपरागत पद्धतीने तेच ते कंत्राटदार व कंत्राटदाराला कामे देण्यासाठी नवनवे फंडे वापरून कोट्यावधी रुपयांची कामे वाटप केल्या जाते व जनतेच्या पैशाची उधळपट्टी केल्या जातं आहे, दरम्यान पर्यावरण संतुलन राखण्याच्या नावाखाली सन २०१८ मध्ये मंजूर झालेले ४० हजार झाडे लावण्याची कामे ही भाजप पदाधिकारी अनिल डोंगरे यांना मिळाले त्यात झाडे लावून झाल्यानंतर त्यांचे संगोपन पण करायचे होते पण सिटीपीएस परिसरातील कचराळा परिसरात लावलेली झाडे ही ५ टक्के सुद्धा शिल्लक राहिली नसल्याचे समोर आल्यानंतर या गंभीर प्रकरणाची दखल घेत भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर बातमी झळकली आणि कंत्राटदार व संबंधित अभियंता यांचे धाबे दणाणले. दरम्यान संपादक यांना कंत्राटदार यांनी फोन करून या प्रकरणी मी जबाबदार नसून सिटीपीएस चे अभियंता जबाबदार आहे, कारण त्यांनी पाण्याची सुविधा करून दिली असती तर झाडे जगली असती अशी प्रतिक्रिया दिली. यावरून कंत्राटदार विरुद्ध संबंधित अभियंता यांच्या वादात लावलेली ३८ हजार झाडे मेली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या परिसरात विद्युत निर्मिती मुळे होणाऱ्या प्रदूषणाचा फटका बसू नये यासाठी निसर्गाचा समतोल राखला जावा व प्रदूषणाचा आघात कमी व्हावा म्हणून कचराळा येथील झुडपी जंगल परीसर क्षेत्रात जंगली झाडे यासह काही फळांची झाडे वाढवून अमेझाॅन जंगलापेक्षाही जास्त घनदाट जंगल निर्माण करण्याचा संकल्प घेऊन ४० हजार झाडे पुरवुन त्याच्या वाहतुकीच्या आणि इतर खर्च पकडून जवळपास ५३ लाख ७० हजार ८७७ रुपयाची किंमत असलेलं कंत्राटं भाजप पदाधिकारी अनिल डोंगरे यांना देण्यात आले, दरम्यान झाडे लावल्याचे दाखविण्यात आले व दोन वर्ष संगोपन करण्यासाठी सिटीपीएस कंपनीने पैसे पण मोजले तरीही आज तिथे ५ टक्के सुद्धा झाडे जगली नाहीनव्हे जगवली गेली नाही व जनतेच्या जवळपास ५४ लाख रुपयांचा कंत्राटदार व संबंधित अभियंता यांच्या परस्पर संगनमताने भ्रष्टाचार करण्यात आला त्यामुळं या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत॑ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here