Home क्राईम स्टोरी काँग्रेस नेते शामकांत थेरे यांचा अवैध मुरुम वाहतूक करणारा हायवा ट्रक एसडीओनी...

काँग्रेस नेते शामकांत थेरे यांचा अवैध मुरुम वाहतूक करणारा हायवा ट्रक एसडीओनी पकडला.

कोट्यावधी रुपयांच्या या गौण खनिज उत्खननाचे मोजमाप करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी.

चंद्रपूर :-

जिल्ह्यात अवैध गौण खनिज व रेती उत्खनन करून कोट्यावधी रुपयांच्या महसुलाची चोरी करणारी सर्वपक्षीय टोळी सक्रिय असुन त्या टोळीतील एक नाव हे काँग्रेस नेते शामकांत थेरे यांचे सुद्धा आहे. अशातच छोटा नागपूर जवळील तिरवंजा परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन करून त्यांची हाववा ट्रक ने वाहतूक करतांना उपविभागीय अधिकारी यांनी त्यांची गाडी पकडल्याने या व्यवसायात सामील असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

शामकांत थेरे हे मागील अनेक वर्षांपासून या अवैध रेती व गौण खनिज उत्खनन करून ते विकण्याच्या व्यवसायात सक्रिय असुन राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर आजपर्यंत मोठी कारवाई झाली नाही. त्यांचे मूल तालुक्यातील तहसीलदार होळी यांच्याशी रेती घाटातून अवैध रेती उत्खनन कामात भागीदारीचे संबंध असल्याची बातमी एका दैनिक वर्तमानपत्रात प्रकाशित झाली होती, दरम्यान जिल्हाधिकारी यांनी रेती स्टॉक उचलण्याची तारीख 10 ऑक्टोंबर ही शेवटची ठरवली असतांना शामकांत थेरे यांचा नागपूर हायवे रोडवर मोरवा येथील रेती स्टॉक परवानगीने आहे का ? हा प्रश्न निर्माण होत॑ आहे, कारण इथे दररोज रेती साठा कमीजास्त होत॑ असतो त्यामुळे नलेश्वर घाटातून अवैध उत्खनन व वाहतूक करून इथे साठा केला जातो अशी माहिती आहे व त्यामुळेच त्यातून दररोज रेती विकली जातं आहे.

दरम्यान उपविभागीय अधिकारी यांनी शामकांत थेरे यांचा अवैध गौण खनिजचा हाववा ट्रक पकडला असल्याने त्यांच्या अवैध व्यवसायाची पोल खुलली आहे. छोटा नागपूर जवळील तीरवंजा परिसरातील गौण खनिज उत्खननाचे मोजमाप करून शामकांत थेरे यांच्यावर फौजदारी सह दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी जोर पकडू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here