Home चंद्रपूर एक दोन नाही तर तब्बल 69 वेळा रक्तदाताचे रक्तदान

एक दोन नाही तर तब्बल 69 वेळा रक्तदाताचे रक्तदान

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

              पुन्हा एका गरजुला मदत नाते रक्ताचे

चंद्रपूर  :-  जिल्हा सामान्य ग्रामीण रुग्णालयात रूग्ण हूमेरा इरफान शेख या पेशंटला वायरल तापामुळे तबेत खूप खराब होती त्यांना तात्काळ B pozitive रक्ताची अत्यंत आवश्यकता होती. ही माहिती नाते रक्ताच्या ग्रुप मध्ये टाकण्यात आली ही माहिती ग्रुप  सदस्यांना माहिती होताच नाते रक्ताचे ग्रूप मधील जितेंद्र मशारकर यांनी तात्काळ सामान्य रुग्णालय गाठून हूमेरा ला अत्यंत अमूल्य अशी मोल्यवान मदत केली.

जितेंद्र मशारकर या रक्तदात्यांनी आतापर्यंत 69 वे रक्तदान केले आहे. विषेश म्हणजे या रक्तादाताची महत्वाची बाब. तो आपल्या मुलाच्या आणि स्वतःच्या वाढदिवसाला दरवर्षी न चुकता रक्तदान करत असतो. आणि पुन्हा महत्त्वाची गोष्ट या दिवशी सुद्धा श्री जितेंद्र मशारकर यांच्या वाढदिवस होता.

आणि योगायोग की त्यांना यावेळी एका गरजू पेशंटला म्हणजे  हूमेरा इरफान शेख यांना अत्यंत गरजेच्या वेळी रक्तदान करून त्यांचे प्राण वाचवण्यात सहयोग केल्या बदल नाते रक्ताचे ग्रूप परिवाराकडून मानाचा सलाम व आभार मानण्यात आले. रक्तदान करतावेळी रक्तदाता जितेंद्र मशारकर , रक्तदात्याना प्रेरित करणारे नाते रक्ताचे ग्रुपच्या माध्यमातून गरजूसाठी सदैव तत्पर राहणार असे या वेळी सांगण्यात आले. यावेळी यांच्या सोबत किसन दा. नागरकर, गिरिधर लोहे, व ब्लड बँक चे अनिल पिंगे साहेब उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here