Home वरोरा धक्कादायक :- विषारी दारू पुरवठा करणारा भाजप कार्यकर्ता फरार, पण शहरातील होर्डिंगवर...

धक्कादायक :- विषारी दारू पुरवठा करणारा भाजप कार्यकर्ता फरार, पण शहरातील होर्डिंगवर हजर?

भाजप पदाधिकारी रमेश राजूरकर यांनी अवैध व विषारी दारू विकणाऱ्या दीपक चव्हाण ला संरक्षण दिल्याने तो पकडल्या जातं नाही का?

वरोरा प्रतिनिधी :-

दारूच्या धंद्याला व दारू पिणाऱ्यांना सक्त विरोध करणारे भाजप पदाधिकारी रमेश राजूरकर यांच्या जवळचा भाजप कार्यकर्ता दीपक चव्हाण हा अवैध व विषारी दारू पुरवठा करतांना पोलीस तपासात आढळून आल्यानंतर व त्यांचेवर वरोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार असल्याची माहिती आहे, पण शहरात लागलेल्या होर्डिंगवर त्याची रमेश राजूरकर यांच्या सोवत जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतांना असलेली उपस्थिती शहरातील जनतेला आश्चर्याचा झटका देत आहे. केवळ हा कार्यकर्ता होर्डिंग वरच नाही तर चक्क भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत सुद्धा फोटोत दिसतं आहे, जनतेला विषारी दारू पाजून त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दीपक चव्हाण या भाजप कार्यकर्त्याला रमेश राजूरकर प्रोत्साहन देत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत॑ असुन भाजप “मुहंमे राम बगल मे छूरी” या वाक्प्रचाराचा तंतोतंत वापर करीत असल्याचे समोर येतं आहे. दरम्यान भाजप पदाधिकारी रमेश राजूरकर यांचा हाच का असली चेहरा अशी जनतेकडून विचारणा होत॑ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मागील 29 ऑक्टोंबर 2023 रोजी अंमली पदार्थ कारवाई विशेष मोटीम दरम्यान पोउपनि किशोर मितरवार व पोलीस स्टॉप पो. स्टे. वरोरा हद्दीत पेट्रोलिंग करून कारवाई करीता माहीती घेत असतांना मिळालेल्या माहीती वरुन मौजा मार्डा येथिल अशोक भैय्याजी पंधराम वय 37 वर्ष रा. मार्डा ह्यांचे घराची मुखबीर खबरे वरुन प्रोव्ही. रेड करीता छाप्पा टाकला असता त्याचे राहते घरात दोन बॉक्स पंलगा मध्ये 37 खरड्याच्या खोक्यात प्रत्येकी 90 एम. एल. मापाच्या देशीदारूने भरलेल्या सिलबंद 3700 निप्पा कि. अं. 1,85,000/- रुपये व त्याचा वापरता रेडमी कंपनीचा मोबाईल कि. अं. 10,000/- रुपये असा एकुन 195,000/- रुपये चा मुद्देमाल मिळुन आला. सदर मालाबाबत त्यास विचारपुस करता सदर दारूचा पुरवठा त्यास दिपक चव्हाण उर्फ दिल्ला रा. नविन वस्ती वरोरा ह्यांनी केल्याचे सांगीतल्याने अप. क्र. 876/2023 कलम 65 (ई), 83 मदाका प्रमाने गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणानंतर आरोपी अशोक भैय्याजी पंधराम याला पोलिसांनी अटक केली असुन दीपक चव्हाण फरार असल्याची पोलिसांची माहिती आहे,  जर शहरात भाजप पदाधिकारी रमेश राजूरकर यांच्यासोबत दीपक चव्हाण दिवाळीच्या शुभेच्छा देतांना दिसतं असेल तर मग  पोलिसांनी राजूरकर यांना विचारणा केली पाहिजे असा सूर उमटत आहे. दरम्यान रमेश राजूरकर हे दीपक चव्हाण यांना संरक्षण देत आहे का ? हे सुद्धा तपासल्या गेले पाहिजे, कारण जनतेला व्यसनमुक्तीचा उपदेश देणारे राजूरकर विषारी दारू चा धंदा करणाऱ्यांना संरक्षण देत असेल तर मग ते जनतेनं काय विचार करावा हे कळायला मार्ग नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here