Home चंद्रपूर आशांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा राहणार सुरूच

आशांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा राहणार सुरूच

अतुल दिघाडे
जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर  :-  आरोग्य अभियानामध्ये कार्यरत असलेल्या आशा गटप्रवर्तकांचे १८ ऑक्टोबरपासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे; मात्र त्यांच्या मागण्यांकडे शासनासह प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता आशा वर्कर्स व एनएचएम कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आहे. दरम्यान, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या संख्येने आशा संघटनेच्या वतीने धरणे देण्यात आले.

या आंदोलनाला भूमिपुत्र ब्रिगेड, बहुजन मेडिकल आणि जिजाऊ सावित्री रमाई मंच यांनी पाठिंबा देत मागण्या पूर्ण होईपर्यंत लढण्याचा निर्धार केला. २००५ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू आहे. या अभियानातील कर्मचारी

कंत्राटी पद्धतीने भरले आहेत. यामध्ये ११ महिन्याची ऑर्डर दिली जाते. नंतर दोन दिवस ब्रेक देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार त्यांची पुनरावृत्ती केली जाते. गट प्रवर्तकांची सुद्धा याचप्रमाणे नियुक्ती केली जाते. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते.

या आंदोलनाला भूमिपुत्र ब्रिगेड, बहुजन मेडिकल आणि जिजाऊ सावित्री रमाई मंच यांनी पाठिंबा देत मागण्या पूर्ण होईपर्यंत एकनिष्ठ होऊन लढण्याचा निर्धार केला आहे. यावेळी भूमिपुत्र ब्रिगेडच्या डॉक्टर अभिलाषा गावतुरे, डॉ. राकेश गावतुरे, बहुजन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर राकेश वनकर, एनएचएमचे डॉक्टर तीरथ उराडे, डॉ. आगवडे, आयटकचे रवींद्र उमाटे आदींनी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here