Home चंद्रपूर चिंताजनक :- कोट्यावधीच्या गौण खनिज उत्खनन प्रकरणी प्रशासनाची कारवाई गुलदस्त्यात ?

चिंताजनक :- कोट्यावधीच्या गौण खनिज उत्खनन प्रकरणी प्रशासनाची कारवाई गुलदस्त्यात ?

10-10 फूट गौण खनिज उत्खनन करून तो विकणाऱ्या शामकांत थेरे व त्यांच्या इतर साथीदारांविरोधात प्रशासनाचे मौन का ?

चंद्रपूर :-

जिल्ह्यात काही भ्रष्ट अधिकारी यांच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने अवैध गौण खनिज व रेती उत्खनन करून कोट्यावधी रुपयांच्या महसुलाची चोरी करणाऱ्या सर्वपक्षीय टोळीतील काँग्रेस नेते शामकांत थेरे यांचा छोटा नागपूर जवळील तिरवंजा परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन करून त्यांची हाववा ट्रक ने वाहतूक करतांना उपविभागीय अधिकारी यांनी त्यांची गाडी पकडल्याने पर्दाफाश झाला. पण तिरवंजा परिसरातील गौण खनिज उत्खनन स्थळावर भेट दिल्यानंतर जी परिस्थिती बघितली असता तीं एवढी भयंकर आहे की या ठिकाणी 10-10 फूट खाली खोदून खड्डे करण्यात आले आहे. दरम्यान हा परिसर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा जवळ असुन या ठिकाणी जंगली जनावरे इथे पडून मृत्यु पडू शकतात व जखमी होऊ शकतात त्यामुळे या गौण खनिज उत्खननाचे मोजमाप करण्यात यायला हवे व या ठिकाणी अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी शामकांत थेरे व त्यांच्या सहकार्यांवर सरकारी मालमत्तेची चोरी करणे या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून झालेल्या उत्खननाचे मूल्यांकन करून दंडात्मक कारवाई सुद्धा झाली पाहिजे अशी मागणी जोर पकडू लागली आहे. दरम्यान महसूल अधिकारी यांची पुढील चौकशी व कारवाई गुलदस्त्यात असुन या संदर्भात ते मौन धारण करून असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जातं आहे.

शामकांत थेरे व त्यांचे इतर साथीदार यांनी अवैध गौण खनिज व रेती चोरी च्या धंद्यातून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता गोळा केली आहे,दरम्यान त्यांचा दुसऱ्याच्या नावावर असलेल्या मूल तालुक्यातील नलेश्वर घाटातून अवैध रेती उत्खनन उत्खनन करून त्याचा साठा चंद्रपूर नागपूर रोड लगत असलेल्या मोरवा जवळ संकलित केला आहे व दरदिवशी तिथे तो रेती स्टॉक उचलल्या जातो व दुसऱ्या दिवशी पुन्हा तो भरल्या जातो त्यामुळे ज्याअर्थी सर्व रेती घाट बंद आहे व जिल्हाधिकारी यांनी दिलेली रेती स्टॉक उचलण्याची मुद्द्त संपली आहे तर मग मोरवा जवळील यांच्या ठिय्यावर रेती येते कुठून हा संशोधनाचा विषय असुन या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची रेती परस्पर विकल्या गेली असल्याची माहिती पण समोर येतं असल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या शामकांत थेरे यांच्या मालमत्तेची ईडी मार्फत चौकशी करण्याची सुद्धा मागणी करण्यात येतं आहे.

Previous articleस्पर्धात्मक जगात गुणवत्ता व ऑनलाईन विक्रीवर भर दयावा – अतिरिक्त आयुक्त श्री. चंदन पाटील
Next articleउद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here