Home चंद्रपूर स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी साजरी करण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन

स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी साजरी करण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

चंद्रपूर  :-  भारत सरकार अधिसूचना क्रमांक जी. एस. आर. 682 (ई) 05 ऑक्टोबर 1999 अन्वये 125 डेसिबल (एआय) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात आणि हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहेत.

त्याचप्रमाणे जनहित याचिका क्र. 152 / 2015  मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाके विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम 1884 आणि त्या अंतर्गत केलेले विस्फोटक नियम 2008 मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करावयाची नाही, तसेच परवानगी असलेले फटाके महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करावयाची आहे. असे आवाहन चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील सर्व फटाके विक्री करणारे व्यावसायिक व फटाके वापर करणारे नागरिक यांना करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाचे माझी वसुंधरा अभियान 4.0 त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024 आणि स्वच्छ वायू सर्वेक्षण अभियान यांची अंमलबजावणी केली जात असताना फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त, प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक हरित सण- उत्सव (ग्रीन फेस्टिवल) साजरे करणे अपेक्षित आहे.

या अभियानांतर्गत नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा, त्यासोबत प्लास्टिकचाही वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. त्याचप्रमाणे सण-समारंभामध्ये टाकाऊ वस्तूंचा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करावा आणि हा दिवाळी उत्सव पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त असा हरित दिवाळी म्हणून साजरा करावा असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.

Previous articleक्राईम:- भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे वर अखेर गुन्हे दाखल करून अटक.
Next articleबचतगटाच्या महिलांनी साजरी केली “जल दिवाळी’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here