Home भद्रावती क्राईम:- भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे वर अखेर गुन्हे दाखल करून अटक.

क्राईम:- भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे वर अखेर गुन्हे दाखल करून अटक.

चामोर्शी पोलिसांनी खंडणीसाठी अपहरण च्या गुन्ह्यात घेतले होते ताब्यात. इतर आरोपी फरार.

भद्रावती प्रतिनिधी :-

भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांना एक दिवसांपूर्वी चामोर्शी पोलिसांनी भद्रावती येथून अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान चामोर्शी पोलिसांनी याबाबत मोठी गुप्तता पाळली होती, त्यामुळे गुन्हे दाखल होईल की प्रकरण थंड वस्त्यांत जाईल याबाबत तर्कवितर्क लावल्या जातं होते, मात्र भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर बातमी प्रकाशित होताच जिकडे तिकडे चर्चेला उधाण आले होते व याबाबत आकाश वानखेडे यांचे विरोधक सक्रिय झाले पण तक्रारकर्ता आपल्या भूमिकेवर ठाम होते त्यामुळे अखेर आकाश वानखेडे यांच्यावर खंडणी साठी अपहरण करणे या गुन्ह्यात चामोर्शी पोलीस स्टेशन मध्ये कलम 364 A, 170 व 34 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. आकाश वानखेडे यांच्या सोबत गुन्ह्यात सहभागी असणारे आरोपीं फरार असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची जवळीक असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांची भद्रावती शहरात व तालुक्यात मोठी नेतागिरी सुरू झाली होती. सत्तेत असल्याने येथील उद्धोगात आपली दहशत निर्माण करून अनेक कामे स्वतःच्या व आपल्या लोंकाना त्यांनी मिळवून दिली होती, एक दिवसांपूर्वी चामोर्शी पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली होतीं मात्र प्रकरण नेमकं काय आहे हे कळलं नव्हतं पण काल त्यांच्यावर चामोर्शी पोलिस स्टेशन मध्ये कलम 364अ, 170, व कलम 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची पोलिसांची अधिक्रुत माहिती हाती लागली आहे. आता या प्रकरणातील इतर आरोपी फरार असुन त्यांचा पोलीस शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here