Home चंद्रपूर चिंताजनक :- सिटीपीएस कंत्राटदार अनिल डोंगरे यांच्यावर कारवाई कधी होणार ?

चिंताजनक :- सिटीपीएस कंत्राटदार अनिल डोंगरे यांच्यावर कारवाई कधी होणार ?

४० हजार झाडे लावण्याचा घोटाळा सिटीपीएस प्रशासनाने दडपला का?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

सिटीपीएस चे कंत्राटदार व श्रीराम एंटरप्रायजेस चे संचालक अनिल डोंगरे यांच्या ४० हजार झाडे लावण्याच्या कामात घोटाळा झाला असल्याच्या बातम्या प्रकाशित होत॑ असतांना सिटीपीएस प्रशासन मात्र याबाबत मौन साधून असल्याने आश्चर्य व्यक्त होत॑ आहे, भाजप चे पदाधिकारी असलेले अनिल डोंगरे यांनी सत्तेचा फायदा घेत सिटीपीएस कंपनीत कोट्यावधी रुपयांची कामे घेतली व त्या कामात मोठा भ्रष्टाचार होत॑ असल्याचे आता या ४० हजार झाडे लावण्याच्या घोटाळ्यावरून स्पष्ट झाले आहे, अशातच कंत्राटदाराला कामे पूर्ण न करता बिल मंजूर करणाऱ्या व जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर पण कारवाई व्हायला हवी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान अनिल डोंगरे सिटीपीएस च्या कामात भ्रष्टाचार करून किती प्रॉपर्ट्या कामवाल्या व त्यांचे या कंपनीत किती कामे आहेत ज्यातून त्यांनी एवढी माया जमवली याबाबत लवकरच खुलासा होणार असल्याची माहिती आहे.

प्रकरण असे आहे की पर्यावरण संतुलन राखण्याच्या नावाखाली सन २०१८ मध्ये ४० हजार झाडे लावण्याचे कंत्राटं श्रीराम एंटरप्रायजेस कंपनीच्या अनिल डोंगरे यांना मिळाले होते, व त्यांचे तीन वर्षांसाठी संगोपन पण करायचे होते पण सिटीपीएस परिसरातील कचराळा परिसरात लावलेली ही झाडे पूर्णता मेली असुन ५ टक्के सुद्धा झाडे शिल्लक राहिली नाही, त्यामुळे भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर याबाबत बातमी झळकली आणि कंत्राटदार व संबंधित अभियंता यांचे धाबे दणाणले. दरम्यान संपादक यांना कंत्राटदार यांनी फोन करून या प्रकरणी मी जबाबदार नसून सिटीपीएस चे अभियंता जबाबदार आहे असे म्हटले होते, त्याबाबत त्यांनी खुलासा देत कंपनीने पाण्याची सुविधा करून दिली नाही त्यामुळे झाडे जगली नाही असे म्हटले होते पण ज्याअर्थी अनिल डोंगरे यांना झाडे जगविण्यासाठी कंत्राट मिळाले तर पाण्याची सुविधा सुद्धा त्यांनीच करायला हवी होती पण तीं त्यांनी केली नाही व त्यांनी ९५ टक्के झाडे मारली ही वस्तुस्थिती असतांना याबाबत कार्यकारी अभियंता उरकुडे यांनी कंत्राटदार अनिल डोंगरे यांचे दोन वर्षांच्या संगोपनाचे बिल दिले कसे हा प्रश्न असुन या प्रकरणात त्यांचा सुद्धा सहभाग असल्याचे दिसतं आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात मुख्य अभियंता आणि संबंधित विभागाचे अभियंता यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा धाक दाखवून आवश्यक नसलेली अनेक कामे अनिल डोंगरे यांनी घेतले असल्याची माहिती असुन वर्षांकाठी ते या कामातून लाखों रुपये २५ टक्के काम न करताही कमावतात अशी माहिती आहे, दरम्यान या कमाईतून त्यांनी कुठे कुठे स्थावर मालमत्ता घेतली यांची सुद्धा सनसनिखेज माहिती समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here