Home चंद्रपूर उघड्यावर कचरा जाळला तर दंड किती कारवाई काय ?

उघड्यावर कचरा जाळला तर दंड किती कारवाई काय ?

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

चंद्रपूर  :-  मागील काही वर्षांमध्ये चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यासोबतच प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक वस्तू विशेषतः यूज अँड थ्रोच्या वस्तूंचा वापर वाढला आहे. त्याचीही भर कचयाच्या ढिगाऱ्यात पडत आहे. त्यामुळे शहरी भागासह मोठी लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावात कचरा वाढत आहे.

तेथील स्थानिक स्वराज्य संस्था या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करतात. मात्र कचरा समस्या सुटताना’ दिसत नाही. उघड्यावर कचरा टाकण्याबरोबर उघड्यावर कचरा जाळण्याची समस्याही गंभीर होत चालली आहे. उघड्यावर कचरा जाळल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे याबाबत कायदा कडक करण्यात आला आहे. असे असतानाही अनेकजण उघड्यावरच कचरा जाळताना दिसत आहे.

कचरा उघड्यावर जाळल्यानंतर कारवाई काय?

उघड्यावर कचरा पेटविणे हा  पर्यावरणविषयक कायद्याने तसेच भारतीय दंड विधानानुसारही गुन्हा आहे. जिल्हा प्रशासन आणि तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांना यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. कचरा कोणी पेटविला याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई होते. ज्यांच्या आवारात कचरा पेटविण्यात आल्याचे आढळून आले.

त्यांनाही यासाठी जबाबदार धरण्याची कायद्यात तरतूद आहे. कचरा जाळल्यामुळे पर्यावरणाला किती धोका झाला याचा अभ्यास केला जातो व त्यानुसार कार्यवाही होते.

                      कायदा काय सांगतो ?

राष्ट्रीय हरीत लवादाला उघड्यावर कचरा पेटविणाऱ्याला पाच हजार रुपये दंड करण्याचा अधिकार होता. त्यानंतर १३ जून २०१६ रोजी दिलेल्या सुधारित आदेशात हा दंड एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. हवा प्रदूषण होते म्हणून पर्यावरण कायद्यानुसार हा गुन्हा ठरविण्यात आला. याशिवाय भारतीय दंड विधानातील कलम २७८ नुसार धोकादायक कृत्य म्हणूनही हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय उपद्रवी कृत्य म्हणून कलम २६८, पाण्याजवळ कचरा पेटविला असेल तर कलम २७७ तसेच कलम २६९ नुसारसुद्धा कचरा पेटविणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते.

 

                  कचरा जाळणाऱ्यांना नोटीस

उघड्यावर कचरा पेटविल्याने प्रदूषण वाढते. याकडे महापालिका प्रशासन लक्ष देऊन आहेत. मागील काही महिन्यांमध्ये उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. या कचयातून आग लागून दुर्घटना होऊ शकते. अशा घटना टाळण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here