Home वरोरा वरोरा तालुक्यातील अर्जुनी (तुकुम) ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटाचा फडकला भगवा,

वरोरा तालुक्यातील अर्जुनी (तुकुम) ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटाचा फडकला भगवा,

सरपंच पदाच्या उमेदवारांसह सर्व 7 उमेदवार विजय, सालोरी ग्रामपंचायत मध्ये तीन उमेदवार विजयी.

शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेत्रुत्वात विजयी. विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत.

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील सालोरी गटग्रामपंचायत व अर्जूनी (तुकुम) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अंतिम निकाल आज समोर आला असून यामध्ये अर्जुनी (तुकुम) ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच पदाच्या उमेदवारासह 7 उमेदवार विजयी झाले असून एकहाती वर्चस्व निर्माण केले आहे. तर सालोरी गट ग्रामपंचायत मध्ये 3 उमेदवारांनी बाजी मारली आहे. या सर्व विजयी उमेदवारांचा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी शाल व पुष्पहार घालून सत्कार करीत अभिनंदन केले.

वरोरा तालुक्यातील सालोरी गट ग्रामपंचायत व अर्जुनी (तुकुम) ग्रामपंचायत करिता निवडणुकीचे बिगुल वाजले होते. या दोन्ही ग्रामपंचायती करिता दिनांक पाच नोव्हेंबर रोज रविवारला मतदान पार पडले. या दोन्ही ग्रामपंचायतीचा अंतिम निकाल आज दिनांक 6 नोव्हेंबर रोज सोमवारला समोर आला असून यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)गटाने बाजी मारली आहे.

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम व शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख रितेश रहाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या सहकार्याने, शिवदूत बंडु डाखरे, सुधीर नन्नावरे यांच्या नेतृत्वात लढविण्यात आलेल्या निवडणुकीत तालुक्यातील अर्जुनी (तूकुम) ग्रामपंचायतीवर भगवा फडकला असून सरपंच पदाचे उमेदवारासह सर्व 7 उमेदवार विजयी झाले आहे. यामध्ये सरपंच पदाकरिता सोनू विकास हनवते यांनी 498 मतदान घेत विजय प्राप्त केला. तर ग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवार प्रशांत श्रीराम, प्रकाश हनवते, संगीता सावसाकडे, प्रफुल्ल भेंडाळे,वैशाली अनिल जांभुळे, मेघा दत्तू कुमरे, जगदीश लक्षमण पेंदाम, माया राजेंद्र पोईनकर हे सर्व उमेदवार विजयी झाले आहे.

तालुक्यातील सालोरी गट ग्रामपंचायत मध्ये विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, शुभम वाकडे यांच्या नेतृत्वात लढविण्यात आलेल्या निवडणुकीत 3 उमेदवारांनी बाजी मारली आहे. यामध्ये शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे गजानन हरिभाऊ देहारी, राहुल ढोके, सौ. सुवर्ण कुळमेथे विजयी झाले आहे. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे शिवसेना जिल्हा कार्यालयात जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन केले.

यावेळी शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, शिवदूत बंडु डाखरे शिवसेना शहर प्रमुख संदीप मेश्राम, माजी नगरसेवक तथा शहर संघटक किशोर टिपले, शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, शिवसेना उपशहर प्रमुख मनिष दोहतरे, ज्येष्ठ शिवसैनिक अनिल गाडगे समस्त शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here