Home Breaking News धक्कादायक :- रेती माफियांनी तहसील कार्यालयातून रेतीचा ट्रक पळवला?

धक्कादायक :- रेती माफियांनी तहसील कार्यालयातून रेतीचा ट्रक पळवला?

जिल्ह्यात अवैध गौण खनिज व रेती चोरी करणाऱ्या टोळीचा पुन्हा एक धमाका. महसूल अधिकारी यांचा रेती व गौण खनिज चोरीमध्ये सहभाग होणार उघड.

चंद्रपूर :-

जिल्ह्यात नुकताच काँग्रेस नेते शामकांत थेरे यांचा अवैध गौण खनिज भरलेला ट्रक उपविभागीय अधिकारी यांनी पकडल्या नंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती, त्यातच आता अवैध रेती चा ट्रक तहसीलदार पवार यांनी पकडल्यानंतर तो तहसील कार्यालयातून रेती माफियांनी गायब केल्याची धक्कादायक घटना महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या रडारवर आली आहे. मात्र हा ट्रक पळवला गेला की पैसे घेऊन सोडवला गेला याबाबत शंकाकुशंका सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यासह इतर महसूल अधिकारी यांच्या आशीर्वादाने अवैध रेती व गौण खनिज उत्खनन होत॑ असल्याच्या अनेक घटना घडत असतांना संबंधित अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई होतांना दिसतं नाही त्यामुळे या तस्करांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. मूल तहसीलदार होळी यांची रेती घाट संचालकांसोबत असलेली साठगांठ व त्यांनी दुसऱ्यांच्या नावाने घेतलेला रेती घाट याबाबत दैनिक भास्कर ने बातम्या प्रकाशित केल्यानंतर सुद्धा त्या तहसीलदार होळी यांच्यावर कार्यवाही झालेली नाही त्यामुळे महसूल प्रशासन स्वतः देशाच्या संपत्तची चोरी करण्याच्या कामात सहभागी असल्याने अगोदर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक असतांना तेच अधिकारी मोकाट असल्याचे विदारक चित्र दिसतं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी अवैध रेती भरलेला ट्रक चंद्रपूर चे तहसीलदार पवार यांनी पकडला होता व तो तहसील व जिल्हा कार्यालयाच्या परिसरात ठेवण्यात आला होता. यांची माहिती मिळताच ग्लोबल महाराष्ट्र न्यूज पोर्टल चे संपादक अनुप यादव व चांदानगरी न्यूज चैनेल चे संपादक मनोज पोतराजे यांनी याबाबत चौकशी करून त्याच्या मालकांचा पत्ता मिळवला परंतु त्याच दिवशी रात्रीतून हा ट्रक पळवला गेल्याची माहिती मिळताच तहसीलदार पवार यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत मला माहीत नाही तुम्हांला माहीत असेल तर सांगा असे उत्तर दिले. यावरून हा ट्रक एकतर तहसीलदार यांनी सोडला असेल किंव्हा तो रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तो पळवला गेला असेल अशी शक्यता बघता पत्रकारांनी याबाबत पकडलेल्या ट्रक क्रमांक MH32-Q9769 चा मालक गौरव काळे याचा शोध घेतला असता तो हिंगणघाट येथील असल्याची माहिती मिळाली आहे. तो बहुदा भाजप पदाधिकारी असावा अशी शंका असुन सत्तेत असण्याचा फायदा घेत त्यांनी अधिकाऱ्यांना सेट करून हा ट्रक सोडवला असल्याची पण चर्चा आहे. दरम्यान हा ट्रक जिथे होता ते ठिकाण आणि रामनगर पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे व या परिसरात येजा सुरू असते आणि पोलीस गस्त पण असते असे असतांना तो ट्रक पळवला गेला असेल तर यामागे मोठी ताकत काम करताहेत अशी परिस्थिती दिसतं आहे, आता रेती व गौण खनिज चोरी करण्याऱ्या टोळीवर प्रशासन काय अंकुश लावतो आणि ट्रक पळवून नेला की सोडला गेला याबाबत प्रशासन काय उत्तर देतात यावर पुढील रणनीती ठरणार असल्याचे पत्रकारांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here