Home वरोरा भगवान शंकराच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांना 24 तासात अटक करा.

भगवान शंकराच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांना 24 तासात अटक करा.

सकल हिंदू समाज संघटनांची पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी.

वरोरा ;-

वरोरा शहरातील उडानपुलाच्या बाजूला असलेल्या स्मशान भूमीतील भगवान शंकराच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना काल दिनांक नोव्हेंबर ला उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा तीव्र निषेध करून त्या समाजकंटकांना येत्या 24 तासात अटक करा अशी मागणी सकल हिंदू समाज संघटना, श्रीराम जन्मोत्सव समिती, श्री शिवप्रतिष्ठान वरोरा, विश्वहिंदू परिषद, बजरंग दल व शिवशाही युवा मंच इत्यादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एक सामूहिक बैठक घेऊन व पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार देऊन केली आहे.

वरोरा शहर हे शांत शहर म्हणून ओळखलं जातं, पण काही धर्मांध व असामाजिक तत्वांची माणसे काहीतरी उचापती करून धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करून सामाजिक आरोग्य बिघडविण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना वेळीच ठेचून काढायला हवे तरच कुण्याही धर्माच्या विरोधात बोलण्याचा व देवीदेवतांच्या विटंबना करावयाची हिंमत होणार नाही, अशातच वरील घटनेच्या निषेधार्थ सर्व हिंदू संघटना एकत्र येऊन 24 तासात आरोपींना अटक करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रारीतून दिला आहे यावेळी शेकडो हिंदू समाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here