Home भद्रावती दखल :- अखेर मनसेच्या तक्रारीनंतर तिरावंजा येतील अवैध गौण खनिज उत्खननाचे मोजमाप?

दखल :- अखेर मनसेच्या तक्रारीनंतर तिरावंजा येतील अवैध गौण खनिज उत्खननाचे मोजमाप?

ट्रांसपोर्टर शामकांत थेरे व त्यांच्या इतर सहकार्यांवर काय दंडात्मक कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष.

चंद्रपूर :-

ट्रांसपोर्टर शामकांत थेरे व त्यांच्या इतर सहकारी यांनी मौजा तिरावंजा परिसरात केवळ 200 ते 300 ब्रॉस गौण खनिज उत्खनन करण्याची तात्पुरती परवानगी असतांना तिथून त्याच्या कित्तेक पटीने म्हणजे हजारो ब्रॉस गौण खनिज उत्खनन केले असल्याची तक्रार मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी वरोरा व तहसील भद्रावती यांच्याकडे केली होती, या तक्रारीची दखल घेऊन नुकतेच भद्रावती तहसीलदार यांनी नायब तहसीलदार भांदककर, मंडळ अधिकारी वाटेकर व तलाठी तिरवंजा यांना आदेश देऊन किती गौण खनिज उत्खनन करण्यात आले याचे मोजमाप करून अहवाल सादर करण्यासाठी सांगितले होते. दरम्यान काल या संपूर्ण गौण खनिज उत्खनन ठिकाणी मोजमाप करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला व तो येत्या 16 नोव्हेंबर ला तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ह्या अहवालात कोट्यावधी रुपयांच्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी तहसीलदार शामकांत थेरे व इतरांवर किती पेनाल्टी लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शामकांत थेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी कोट्यावधी रुपयांच्या गौण खनिजांचे उत्खनन करून शासनाचा महसूल बुडविला आहे. रेती चोरी नंतर गौण खनिजांची चोरी करणारे शामकांत थेरे यांच्याकडे पोकल्यान मशीन जेसीबी व कित्तेक हायवा ट्रक असल्याने आजपर्यंत त्यांनी कोट्यावधी रुपयांचा गौण खनिज विकून शासनाचा महसूल बुडविला आहे, अवैध रेती व गौण खनिज उत्खनन करणाऱ्या शामकांत थेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दादागिरी करून ज्या पद्धतीने राष्ट्रीय संमतीची चोरी चालवली आहे त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व फौजदारी कारवाई सुद्धा करण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत॑ आहे.

कोट्यावधी रुपयांच्या या गौण खनिज उत्खनन प्रकरणी ज्या एक पोकल्यान व तीन जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला आणि हायवा ट्रकने वाहतूक करण्यात आली त्या सर्व मशीन व ट्रक जप्ती करण्यात याव्या अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आली आहे.

शामकांत थेरे यांच्या मोरवा येथील रेती साठा बेकायदेशिर ?

मागील अनेक महिन्यांपासून शामकांत थेरे यांनी मोरवा येथे केलेला रेती साठा हा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतांना तहसीलदार पवार यांच्या लक्षात येतं नसेल का ? याचे आश्चर्य वाटतं असुन दिवाळी च्या शुभ मुहूर्तावर त्यांनी लाखों रुपयांची भेट स्वीकारल्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असावे अशी शक्यता वाटतं आहे. दरम्यान कुठलाही रेती साठा करतांना त्यांची पूर्व परवानगी व त्यासाठी अटी आणि शर्ती लागू असते पण सर्व अटी आणि शर्ती धाब्यावर बसवून शामकांत थेरे यांनी तीस ते चाळीस ट्रक इतका रेती साठा तहसीलदार पवार यांच्या आशीर्वादाने असल्याची माहिती आहे त्यामुळे तहसीलदार पवार यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत॑ आहे.

Previous articleभगवान शंकराच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांना 24 तासात अटक करा.
Next articleकाँग्रेसचा हात गरिबांसोबत : दिनेश चोखारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here