Home चंद्रपूर काँग्रेसचा हात गरिबांसोबत : दिनेश चोखारे

काँग्रेसचा हात गरिबांसोबत : दिनेश चोखारे

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

                कोर्टीमत्ता वंचिताची दिवाळी; रवा, साखर वाटप

चंद्रपूर   :-  काँग्रेसने नेहमी गरिबांना साथ दिली आहे. विविध योजना त्यांचेसाठी चालू केल्या व त्या आजही सुरु आहे. त्या योजनांचा लाभ सर्वांना होत आहे. आम्ही सदैव आपल्या सोबत असून कॉग्रेसचा हात गरिबांसोबत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नेते कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे यांनी केले.

दिवाळी हा सण सर्वांसाठी आनंद आणि उत्साहाचा असतो. मात्र, काही वंचित घटकांना दिवाळीचा आनंद घेता येत नाही. यासाठी श्री. दिनेश दादापाटील चोखारे यांच्या वतीने शनिवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ रोजी “वंचितांची दिवाळी या उपक्रमांतर्गत उपक्रमांतर्गत रवा व  साखर वाटप करण्यात आले.
कोर्टीमत्ता या गावात दिवाळीच्या निमित्याने आयोजित रवा साखर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बल्लारपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष गोविंदा पाटील उपरे, ओबीसी नेते सचिन राजूरकर, बल्लारपूर नगर परिषदेचे माजी सदस्य भास्कर माकोडे, सुरेश वासाडे, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष असीम भाई खान, सुरेश भप्पनवार, कोर्टीमत्ताचे माजी उपसरपंच दिलीप भोयर, ग्रामपंचायतचे सदस्य मनोज सोयाम,   ग्रामपंचायतचे सदस्या मंदा मडावी, ग्रामपंचायतचे सदस्या वर्षा भोयर, यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात श्री. चोखारे म्हणाले की, “दिवाळी हा सण सर्वांसाठी आनंददायी असतो. मात्र, काही वंचित घटकांची दिवाळी गोड झाली पाहिजे यासाठी मी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत वंचित घटकांना साखर वाटप करण्यात आली आहे. यामुळे त्यांना दिवाळीचा आनंद घेता येईल.” त्यासोबत आमचा उद्देश हा सर्वाना सोबत घेऊन चालणे हाच आहे. गोरगरीबाना वेळोवेळी साथ देणे हाच मुख्य हेतू ठेऊन काँग्रेस समोर जात आहे. आपण काँगेस सोबत उभे राहावे, असे आवाहन करत काँग्रेस ची सत्ता असतानाच्या विविध योजनांचा आजही आपणास फायदा होत आहे. आम्ही आपल्या सोबत आहोत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी घनश्याम मुलचंदानी यांनी अध्यक्षयीय मनोगत व्यक्त करताना म्हटले कि, काँग्रेस नेहमी सर्वांचे मदतीला धावून आली आहे. पक्ष्याचे ध्येय धोरण सागंताना ते म्हणले कि, काँगेसने सुरुवातीपासूनच देशातील सर्व जनतेसोबत खंबीर उभे राहून त्यांना सहकार्यकेले आहे. कायक्रमाचे प्रास्ताविक व संचालन तालुका अध्यक्ष गोविंदा पाटील उपरे यांनी केले. या कार्यक्रमात कोर्टीमत्ता, कोर्टि तुकुम, कोर्टीमत्ता नविन गावातील शेकडो गावकर्याना साखर वाटप करण्यात आली. या कार्यक्रमामुळे वंचित घटकांना दिवाळीचा आनंद घेता आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here