Home भद्रावती क्राईम :- भाजपचे आकाश वानखेडेसह तिघांची का झाली कारागृहात रवानगी ?

क्राईम :- भाजपचे आकाश वानखेडेसह तिघांची का झाली कारागृहात रवानगी ?

चामोर्शी पोलिस स्टेशन मध्ये पोलीस कस्टडीत असताना  न्यायालयाचा निर्णय. भाजपच्या वरिष्ठांचे मदतीस हात वर.

भद्रावती प्रतिनिधी :-

भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांनी तोतया अधिकारी बनून एका व्यक्तीस खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना घडल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान भाजप ची सगळीकडं सत्ता असल्याने आकाश वानखेडे यांना या प्रकरणातून सोडवले जाईल असा राजकीय कयास लावला जातं होता, मात्र भाजप च्या वरिष्ठांनी आकाश वानखेडे यांना या प्रकरणात मदत करण्यास नकार दिला असुन त्यांच्या नातेवाईकांस यापुढे असले काम घेऊन यायचे नाही अशी तंबी दिली असल्याची चर्चा आहे. दरम्यान आकाश वानखेडे यांच्या या कृत्यामुळे पक्षाची बदनामी झाली असल्याने त्यांना पक्षाबाहेर काढले जाण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी आकाश वानखेडे व त्यांच्या तीन आरोपी सहकाऱ्यांची कारागृहात रवानगी करण्याचा आदेश दिला असल्याची माहिती असुन त्यांची नुकतीच कारागृहात रवानगी सुद्धा केली असल्याचे सांगण्यात येतं आहे.

चामोर्शी पोलिसांनी तोतया अधिकारी बनून खंडणी करिता अपहरण केल्या प्रकरणी आकाश वानखेडे यांना भद्रावती येथून अटक केल्यानंतर पहिल्यांदा भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल द्वारे बातमी प्रकाशित झाली होती, त्यामुळं आकाश वानखेडे यांचे राजकीय शत्रू व निकटवर्तीय यांच्यात चढाओढ निर्माण झाली होती की आता यापुढे काय होईल, दरम्यान न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली होती कारणं तीन आरोपी यांना अटक झाली नव्हती मात्र दोन दिवसांतच पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून तपास पूर्ण केल्यामुळे आरोपी आकाश वानखेडे यांच्यासह तिघांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

आकाश वानखेडे यांनी अल्पावधीतचं राजकीय यश मिळवले असल्याची चर्चा होत॑ असतांना त्यांनी एवढ्या लवकर आपला थाटबाट कसा काय वाढवला हा चर्चेचा विषय होताच मात्र आकाश वानखेडे यांनी भाजप सारख्या सत्ताधारी पक्षात असल्याचा फायदा घेत अनेकांना लुबाडले का ? या दिशेने तपास सुरू आहे, राजकीय गुन्हेगारांचा हौदास हा नेहमीच चिंतेचा व चिंतनाचा विषय राहिला असुन आजच्या स्थितीला अवैध कामात जास्तीत जास्त राजकीय पक्षाचे पदाधिकारी गुंतले असल्याची परिस्थिती दिसतं आहे. त्यात आकाश वानखेडे यांनी त्यांच्या तालुक्यात व वरोरा तालुक्यात अवैध कामे करणाऱ्यांचा बडगा काढत खंडणी वसुली सुरू केली असल्याची चर्चा होती, त्यामुळेच त्यांनी चक्क तोतया अधिकारी बनून खंडणीसाठी एका व्यक्तीचे अपहरण केले होते, मात्र हा डाव फसला आणि त्यांना या प्रकरणात जेल ची हवा खावी लागली हे विशेष.

Previous articleकाँग्रेसचा हात गरिबांसोबत : दिनेश चोखारे
Next articleसाप्ताहिक सर्व देशबांधव च्या दिवाळी अंकाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते प्रकाशन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here