Home चंद्रपूर साप्ताहिक सर्व देशबांधव च्या दिवाळी अंकाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते प्रकाशन.

साप्ताहिक सर्व देशबांधव च्या दिवाळी अंकाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते प्रकाशन.

वाचकांना अनेक राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीची मेजवानी.

चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्ह्यात काही मोजके साप्ताहिक दिवाळी विशेषांक प्रकाशित करून आपले नावीन्यपूर्ण प्रयोग जोपासत असतात त्यात साप्ताहिक सर्व देशबांधवचे संपादक रवींद्र बोकारे हे अग्रस्थानी असुन त्यांनी या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दिवाळी पाडवा च्या दिवशी चंद्रपूर येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात केले.

मूल येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक सर्व देशबांधव चा अंक प्रत्तेक आठवड्याला नियमित वाचकांच्या हातात येतं असतो व या अंकात सामाजिक राजकीय तसेच प्रशासकीय बाबीचे विशेष विश्लेषण असते सोबतच शिक्षण आरोग्य याबाबत नावीन्यपूर्ण माहिती प्रकाशित करण्यात येते त्यामुळं सर्व देशबांधव हे साप्ताहिक सर्वार्थाने वाचकांना आवडत असते, दरम्यान आता दिवाळी अंकात कुणाचे फटाके फोडण्यात आले याबद्दल वाचकांची उत्सुकता शिगेला पोहचली असल्याने दिवाळी विशेषांक वाचकांना पर्वणी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here