Home चंद्रपूर सनसनीखेज :-चंद्रपूर जिल्ह्यातील आरटीओ नंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग पण दिवाळीच्या वसुलीत?

सनसनीखेज :-चंद्रपूर जिल्ह्यातील आरटीओ नंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग पण दिवाळीच्या वसुलीत?

दरमाहा लाखों रुपयाची अवैध वसुली करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकऱ्यांनी काही पत्रकारांना जाहिरातीच्या नावाने पैशाची पाकीट वाटले, बाकीचे त्यांनीच लाटले ?

दिवाळी विशेष :-

जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कर्मचारी यांनी जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट कंपन्याकडून दिवाळी ला पत्रकारांच्या नावाने कोट्यावधीची वसुली केल्यानंतर त्यातून काही दरमहा हप्ता घेणाऱ्या पत्रकारांना पैशाची पाकीट वाटल्या गेली पण जिल्ह्यातील इतर पत्रकारांना आरटीओ कार्यलयात येण्यास मज्जाव केला त्याबद्दल भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर बातमी प्रकाशित करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व त्यांच्या वसुली करणाऱ्या टोळीचा पर्दापॉश केला होता, आता त्याच धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या आदेशाने जिल्ह्यातील बिअर बार, बिअर शॉपी, देशी दारू दुकान, वाईन शॉपी व ताडीच्या दुकानदाराकडून पत्रकारांच्या नावाने लाखो रुपयाची वसुली करून केवळ मोजक्या पत्रकारांना एक एक हजार ते पाच पाच हजाराची पाकीट वाटून उरलेल्या किमान 50 लाख रुपयाच्या वसुलीची रक्कम येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाटून घेतली असल्याची चर्चा आहे, अगोदरच दरमहा बिअर बार, बिअर शॉपी, देशी दारू दुकान, वाईन शॉपी व ताडीच्या दुकानदाराकडून लाखो रुपयाची वसुली करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची पोलखोल भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर प्रकाशित करण्यात आली होती, दरम्यान आता दिवाळी च्या नावाने अतिरिक्त वसुली करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यानी पत्रकारांच्या नावाने पैसे ताटले आणि मोजक्या काही पत्रकारांना वाटले मात्र बाकीचे उर्वरित पैसे त्यांनी अपासात वाटल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे.

जिल्ह्यात दिवाळीच्या निमित्याने अनेक वर्तमानपत्र, टीव्ही न्यूज चैनेल, न्यूज पोर्टल चे पत्रकार प्रतिनिधी हे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे दिवाळी ची भेट मिळावी म्हणून आपले पत्रक घेऊन जातात आणि अनेक विभागाचे अधिकारी हे त्यांच्या कुवतीनुसार पत्रकार व प्रतिनिधींना भेटीच्या स्वरूपात पैशाची पाकीट देतात. यामध्ये जिल्हापरिषद, पंचायत समिती, वेकोलि, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, महानगरपालिका, पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय याचा समावेश आहे. खरं तर त्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिवाळी निमित्याने पैशाची पाकीट का द्यावी हा संशोधनाचा भाग असला तरी वर्षभर पत्रकार व प्रतिनिधी हे शासनाच्या योजनांची माहिती, त्यांनी केलेल्या कार्यवाहीची बातमी, शासनाचे आदेश व शासनाच्या विविध विभागातील बातम्या प्रकाशित करून त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांची पण प्रशिद्धि करतात, पण या सर्व बातम्या प्रशिद्ध करतांना ते याचे पैसे घेत नसतात, मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागात सरकारी अधिकारी कर्मचारी यांना महिन्याकाठी लाखों रुपयांचा पगार मिळतं असतांना जिल्ह्यातील बिअर बार, बिअर शॉपी, देशी दारू दुकान, वाईन शॉपी व ताडीच्या दुकानदारांकडून ते वर्षभर पैसे घेत असतात तेच अधिकारी कर्मचारी त्यांच्या विभागाची बातमी छापणाऱ्या पत्रकार प्रतिनिधी यांना मात्र वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळी निमित्याने मदतरुपी भेट देत नसेल तर मग त्या सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढण्यात गैर काय आहे ? एकीकडे पत्रकारांच्या नावाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी बिअर बार, बिअर शॉपी, देशी दारू दुकान, वाईन शॉपी व ताडीच्या दुकानदारांकडून शक्तीची वसुली करतात मात्र त्याचं पत्रकारांच्या नावाने उकळलेली रक्कम पत्रकारांना न देता अधिकारी कर्मचारी हे गिळंकृत करतात अशी परिस्थिती दिसतं आहे. खरं तर दिवाळीच्या निमित्याने पत्रकार व प्रतिनिधी काय मागतो ? तर एक शुभेच्छा भेट, पण भ्रष्टाचाराने बरबटलेले निगरगट्ट प्रशासन व निर्ढावलेले सरकारी अधिकारी कर्मचारी यांना त्या बिचाऱ्या पत्रकारांच्या भावना समजत नसतील तर मग या भ्रष्टाचारी व्यवस्थेचा पंचनामा व्हायलाचं हवा आणि येणाऱ्या काही दिवसात हा पंचनामा होईल अशी परिस्थिती दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here