Home चंद्रपूर लक्षवेधक :- चंद्रपूर तहसील परिसरातून पळवलेल्या ट्रकची रेती कुठली ?

लक्षवेधक :- चंद्रपूर तहसील परिसरातून पळवलेल्या ट्रकची रेती कुठली ?

चंद्रपूर व मूल तहसीलदार यांना रेती वाहतूक करणाऱ्यांकडून जातं असलेली रसद बघता गडचिरोली जिल्ह्याचे नाव येऊ शकते समोर.

चंद्रपूर :

काही दिवसांपूर्वी अवैध रेती भरलेला ट्रक चंद्रपूर चे तहसीलदार पवार यांनी पकडला होता व तो तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठेवण्यात आला होता. दरम्यान त्याचं रात्री ट्रक मालकांनी किंव्हा ट्रक ड्राइवर यांनी तो ट्रक त्या परिसरातून पळवला. यांची माहिती काही पत्रकारांना झाल्यानंतर त्यांनी तहसीलदार यांना फोन करून विचारणा केली असता तो ट्रक खरंच गायब झाला का? असा प्रतिप्रश्न तहसीलदार पवार यांनी पत्रकारांना विचारला व त्यानंतर विविध न्यूज पोर्टल व दैनिक वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या, त्यामुळं तहसीलदार पवार यांच्या अंगलट प्रकरण येताच त्यांनी रामनगर पोलीस स्टेशन मध्ये ट्रक पळवल्याची तक्रार दिली. परंतु हिंगणघाट येथील ट्रक क्रमांक MH32-Q9769 चा मालक गौरव काळे याचा अजूनपर्यंत शोध घेण्यात आला नाही. दरम्यान त्या ट्रक मधील रेती ही नेमक्या कुठल्या रेती घाटातून आणली गेली यांचाही शोध लागला नाही त्यामुळे मूल व चंद्रपूर तहसीलदार यांचे रेती घाट व्यावसायिकांशी असलेले अर्थपूर्ण संबंध बघता त्यांना वाचविण्यासाठी ही रेती बहुदा गडचिरोली जिल्ह्यातील घाटामधून आणलेली आहे अशी बतावणी तहसीलदार पवार करू शकतात असा अंदाज आहे.

जिल्ह्यात नुकताच काँग्रेस नेते शामकांत थेरे यांचा अवैध गौण खनिज भरलेला ट्रक उपविभागीय अधिकारी यांनी पकडल्या नंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती, त्यातच आता अवैध रेती चा ट्रक तहसीलदार पवार यांनी पकडल्यानंतर तो तहसील कार्यालयातून रेती माफियांनी गायब केल्याने व ती ट्रक मधील रेती मूल तालुक्यातील घाटातून आणली जाण्याची शक्यता असल्याने ट्रक मालक पकडला गेला तरी तहसीलदार त्या अवैध उत्खनन करणाऱ्या घाट मालकांवर कारवाई करणार का याबाबत संभ्रम आहे.

गायब झालेल्या ट्रकची रेती कुठली ?

चंद्रपूर तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून गायब झालेल्या ट्रक मधील रेती ही मूल व सावली तालुक्यातील रेती घाटातून आणलेली असावी असा अंदाज असुन सावली येथील पैनगंगा नदीवरील सामदाबूज या घाटातून किंव्हा मूल तालुक्यातील नलेश्वर रेती घाट जो शामकांत थेरे यांच्या मालकीचा असल्याची प्रतिक्रिया स्वतः त्यांनी एका दैनिकाच्या पत्रकाराला दिली त्या घाटातून ह्या गायब झालेल्या ट्रक मधील रेती असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे हे दोन्ही घाट बंद असले तरी स्थानिक तहसीलदार यांच्या संगनमताने त्या घाटातून बेकायदेशीर रेती उपसा सुरूच असल्याची चर्चा असल्याने त्या गायब ट्रक मधील रेती ही नलेश्वर किंव्हा सामदाबूज रेती घाटातील असल्याची संभावना बघता या रेती घाटाची पाहणी करून व त्यांचे मोजमाप करून रेती घाट मालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत॑ आहे.

Previous articleसनसनीखेज :-चंद्रपूर जिल्ह्यातील आरटीओ नंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग पण दिवाळीच्या वसुलीत?
Next articleभाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी महेंद्र निंबार्ते यांची नियुक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here