Home चंद्रपूर भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी महेंद्र निंबार्ते यांची नियुक्ती

भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी महेंद्र निंबार्ते यांची नियुक्ती

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

मुंबई येथे झालेल्या भाजपा ओबीसी मोर्चाच्या बैठकीत महेंद्र निंबार्ते ओबीसी मोर्चा प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी

 

भंडारा  :-  भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी महेंद्र निंबार्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीत हे नियुक्तीपत्र ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी महेंद्र निंबार्ते यांना दिले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून महेंद्र निंबार्ते यांनी काम केले. २००५ ते २०१६ या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. या काळात विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले.

महेंद्र निंबार्ते यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात भंडारा नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून झाली. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. दरम्यान मुंबई येथे झालेल्या भाजपा ओबीसी मोर्चाच्या बैठकीत त्यांच्यावर ओबीसी मोर्चा प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी महेंद्र निंबार्ते यांची नियुक्तीआहे.

हे नियुक्तीपत्र प्रदेशाचे अध्यक्ष संजय गाते यांनी त्यांना दिले. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थकी ठरविण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू असे महेंद्र निंबाते यांनी सांगितले.

Previous articleलक्षवेधक :- चंद्रपूर तहसील परिसरातून पळवलेल्या ट्रकची रेती कुठली ?
Next articleमागण्या पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार – आ. किशोर जोरगेवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here