Home Breaking News .मा. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे मागणी नुसार विसापूर अंडरपासची लवकरच दुरुस्ती...

.मा. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे मागणी नुसार विसापूर अंडरपासची लवकरच दुरुस्ती होणार

रेल्वे अभियंतानी संदीप पोडे यांना आश्वासन दिले

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- विसापूर रेल्वे अंडर पासचा खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याच्या विसापूर ग्रामवासीयांच्या मागणीसाठी भा.ज.यू.मो.चे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोडे यांनी आज 16 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री
*श्री.मा. ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार* यांची नियोजन भवन चंद्रपूर येथे भेट घेऊन समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.
त्यांच्या सूचनेवरून व भाजपा तालुकाध्यक्ष सन्मा.किशोरभाऊ पंदिलवार यांच्या मार्गदर्शनाखाली NRUCC सदस्य रेल्वे मंत्रालय सन्मा. अजय भाऊ दुबे व जिल्हा भाजपा सरचिटणीस सन्मा. नामदेव भाऊ डाहुले यांच्या सोबत सहाय्यक विभागीय अभियंता मध्य रेल बल्लारशाह श्री.सुबोध कुमार यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या समस्या समझवून सांगण्यात आल्या . श्री सुबोध कुमार यांनी स्वत: अंडरपासची पाहणी करून लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले.भाजयुमो नेते निखिल घुगलोत यावेळी उपस्थित होते..

Previous articleदखल :-  शामकांत थेरे यांच्यावर अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी तब्बल 15 कोटीपेक्षा जास्तीचा दंड ?
Next articleमहावितरण कंपनीतील लाईनमॅन सह इतर रिक्त पदे भरा – आ. किशोर जोरगेवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here