Home क्राईम स्टोरी दखल :-  शामकांत थेरे यांच्यावर अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी तब्बल 15...

दखल :-  शामकांत थेरे यांच्यावर अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी तब्बल 15 कोटीपेक्षा जास्तीचा दंड ?

कारवाई होणार असल्याने बातमी प्रकाशित करणाऱ्या पत्रकारांना कांग्रेस नेते शामकांत थेरे यांची धमकी?

चंद्रपूर :-

काँग्रेस चे नेते तथा ट्रांसपोर्टर शामकांत थेरे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मौजा तिरावंजा परिसरात केवळ 200 ते 300 ब्रॉस गौण खनिज उत्खनन करण्याची तात्पुरती परवानगी असतांना त्याच्या कित्तेक पटीने म्हणजे जवळपास 20 ते 30 हजार ब्रॉस गौण खनिज उत्खनन केले असल्याचे मंडळ अधिकारी यांच्या मोजमापानंतर प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले आहे. दरम्यान शुक्रवारी नायब तहसीलदार भांदककर हे प्रत्यक्ष मोजमाप करणार आहे त्यामुळं खरा आकडा समोर येणार असून शमाकांत थेरे यांच्यावर 15 कोटिपेक्षा जास्तीचा दंड महसूल विभागाकडून आकारला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. मागील दोन वर्षांपूर्वीच्या दरम्यान शमाकांत थेरे यांच्यावर अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी कोट्यावधी रुपयाचा दंड आकारण्यात आला होता. मात्र तत्कालीन उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्यासोबत सेटिंग करून ते प्रकरण दडपलं होतं, ते प्रकरण आता समोर येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अनेक वर्तमानपत्रात व न्यूज पोर्टल मध्ये शामकांत थेरे यांच्या अवैध गौण खनिज चोरी प्रकरणी बातम्या प्रकाशित होतं असल्याने या सर्वांचे बातमी स्रोत असणाऱ्या भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या संपादकाना पाहून घेण्याची धमकी मिळाली असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पत्रकार संघांचे शिस्टमंडळ भेटून धमकी देणाऱ्या रेती व गौण खनिज माफिया शामकांत थेरे यांची तक्रार करणार असल्याची पण माहिती समोर आली आहे.

मौजा तिरावंजा परिसरातअवैध गौण खनीज उत्खनन प्रकरणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी वरोरा व तहसीलदार भद्रावती यांच्याकडे तक्रार केली होती, या तक्रारीची दखल घेऊन नुकतेच भद्रावती तहसीलदार यांनी नायब तहसीलदार भांदककर, मंडळ अधिकारी वाटेकर व तलाठी तिरवंजा यांना आदेश देऊन किती गौण खनिज उत्खनन करण्यात आले याचे मोजमाप करून अहवाल सादर करण्यासाठी सांगितले होते. दरम्यान या संपूर्ण गौण खनिज उत्खनन ठिकाणी मोजमाप केले असता मंडळ अधिकारी यांनी केवळ 14 ते 15 हजार ब्रॉस गौण खनिज उत्खनन केल्याचा अहवाल तयार केला होता मात्र प्रत्यक्षात त्याहीपेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन करण्यात आल्याने आज दिनांक 17 नोव्हेंबर ला स्वतः नायब तहसीलदार भांदककर हे मोजमाप करणार आहे त्यामुळे हा आकडा जवळपास 20 ते 30 हजार ब्रॉस पर्यंत पोहचू शकतो त्यामुळं यावर दंड आकारणी केल्यास हा आकडा 15 कोटिपेक्षा जास्तीचा जाऊ शकतो त्यामुळे रेती व गौण खनिज माफिया शामकांत थेरे यांना या अवैध गौण खनीज उत्खननाचा दंड महागात जाणार आहे.

Previous articleदारू पिणाऱ्यांना मोठा झटका बारमध्ये दारू पिणे महागणार
Next article.मा. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे मागणी नुसार विसापूर अंडरपासची लवकरच दुरुस्ती होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here