अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
महाराष्ट्र :- सरकारने दारू पिणाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. राज्य सरकारने मूल्यवर्धित करात 5% टक्के वाढ जाहीर केली आहे. आता मद्यावरील व्हॅट 10% टक्क्यांपर्यंत जाणार आहे. याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून होणार आहे. त्यामुळे राज्यात दारू महाग होणार आहे.
विशेष म्हणजे हा बदल फक्त क्लब, लाऊंज आणि बारमधील मद्यप्रेमींना लागू असेल. राज्य सरकारच्या या निर्णयाचा परिणाम मद्यविक्री विभागावर होणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात नागपुरात आज सर्वच बार बंद करण्यात आले असून निदर्शने करण्यात येत आहे. सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी नागपूरसह विदर्भात आज आंदोलन करण्यात आले.
बार मालकांनीही आज बार बंदची घोषणा केली असून सकाळपासून सर्व बार बंद ठेवून निषेध व्यक्त केला, नागपुरात ही निदर्शने झाली या ठिकाणी बार मालकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत वाढीव व्हॅट मागे घेण्याची मागणी केली. तसेच बार मालकांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले व हा आदेश लवकरात लवकर मागे घेण्याची मागणी केली आहे.