Home चंद्रपूर मुनगंटीवार विरोधात दिनेश चोखारे निवडणूक रिंगणात उतरणार ?

मुनगंटीवार विरोधात दिनेश चोखारे निवडणूक रिंगणात उतरणार ?

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते दिनेश दादा पाटील चोखारे हे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून आमदारकी लढण्यासाठी सज्ज होत असल्याचे चित्र निरदर्शनास आलेले आहेत.

नुकताच दिवाळी हा महत्वपूर्ण सण धुमधडाक्यात साजरा झाला याप्रसंगी राजकीय नेत्यांनी आप आपल्या शहरात शुभेच्छा फलक लावलें मात्र दिनेश चोखारे यांनी संपूर्ण बल्लारपूर – मूल विधानसभेत शुभेच्छा फलक लावत आपण आमदारकी साठी ईच्छुक असल्याचे दाखवून दिले मुनगंटीवारांच्या क्षेत्रात चोखारेचा कस लागेल काय ?

बल्लारपूर मतदारसंघात सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री भाजपचे हेवी वेट नेते सुधीर मुनगंटीवार हे आमदार आहेत. मुनगंटीवार हे मुत्सद्दी राजकारणी असून जनसंपर्कात राहणारे नेते आहेत. गेल्या निवडणुकीत डॉ. विश्वास झाडे यांनी काँग्रेसच्या वतीने जोरदार लढा दिला होता. यावेळेस चोखारे यांनी दंड थोपाटले असून काँग्रेस पक्षाचे अधिकृत तिकीट त्यांना मिळतो की अन्य कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते हे येणारा वेळच सांगेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here