Home Breaking News स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारीच नरेश डाहूले निघाला घरफोडी प्रकरणातील मुख्य आरोपी ?

स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारीच नरेश डाहूले निघाला घरफोडी प्रकरणातील मुख्य आरोपी ?

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर   :-  जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याकरिता असलेला विभाग म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा मात्र या विभागातील कर्मचारी स्वतः घरफोडी प्रकरणातील मुख्य आरोपी निघाल्याने जिल्हा पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.. शहरातील तुकूम भागात राहणाऱ्या इरफान शेख यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार 15 नोव्हेम्बरला रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली होती.

इरफान शेख हे पत्नीसह 9 नोव्हेम्बरला हज ला गेले होते, या दरम्यान त्यांच्या घरी अज्ञातांने दाराचे कुलूप तोडत आ प्रवेश करीत आलमारीत ठेवलेले 12 हजार रुपये चोरून नेले.

रामनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाली, रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, सदर प्रकरणी पोलिसांनी सर्व बाबी तपासत 4 दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी नरेश डाहूले यांना रामनगर पोलिसांनी अटक केली. विशेष बाब म्हणजे शेख हे डाहूले यांच्या घराशेजारी राहत होते, ते हज ला गेले ही बाब डाहूले यांना माहिती होती. मिळालेल्या माहिती नुसार आरोपी पोलीस कर्मचारी नरेश डाहूले यांनी याआधी सुद्धा 2 ते 3 घरफोडी केल्याचा संशय आहे. त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here