Home चंद्रपूर धक्कादायक ;- स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारीच निघाला चोर ?

धक्कादायक ;- स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारीच निघाला चोर ?

स्थानिक गुन्हे शाखा विरोधात तक्रार करणारा तो लोकप्रतिनिधी कोण यांचाही चेहरा येणार समोर.

चंद्रपूर:-

चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या अधिनस्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वचक राहिला नसल्याने पोलीस कर्मचारी सैरावैरा झाले झाले असल्याचे चित्र नुकतेच एका घटनेमुळे समोर आले असुन स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारीचं घरफोड्या करण्याच्या कामात सापडला असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजी चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरात सरकार नगर येथे घरफोडी झाली असल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. या घटनेचा तपास पोलिसांनी केला असता या घरफोडीत स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारी नरेश डाहूले आरोपी निघाल्याने एकच खळबळ उडाली, ज्या स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून अट्टल गुन्हेगारांना शोधल्या जाते त्याचं शाखेतील पोलीस कर्मचारी चोर निघावा म्हणजे मग पोलीस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचे दुर्लक्ष होत॑ आहे हे स्पष्ट होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या विरोधात ग्रुहमंत्र्यांकडे लोकप्रतिनिधीची तक्रार?

जिल्ह्यातील सर्वच विभागात हप्ताखोरी सुरू असल्याने त्यात आपण पण मागे कसे हा प्रश्न एका लोकप्रतिनिधीला पडला व त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना माझ्या कार्यक्रमासाठी एवढे पैसे हवे म्हणून तगादा लावला मात्र त्यांनी त्यांची अपेक्षा पूर्ण केली नसल्याने त्यांनी चक्क ग्रुहमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान अधिकाऱ्यांची शेवटी या संदर्भात बदली होणार होती पण त्या मोबदल्यात त्या लोकप्रतिनिधी यांनी 25 ते 30 लाख घेऊन प्रकरण थांबवलं. या अगोदर सुद्धा यांचं लोकप्रतिनिधीनी दारूबंदी असताना हप्ता मिळावा म्हणून अवैध दारूचा साठा पकडून दिला होता व उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सुद्धा यांची वसुली आहे तो लोकप्रतिनिधी कोण हे लवकरच समोर येणार असुन ज्या कामासाठी लोकप्रतिनिधीना जनता निवडून देते ते काम सोडून हे लोकप्रतिनिधी हप्ता वसुली करत असेल व सार्वजनिक उत्सव साजरे करून त्यासाठी वर्गण्या गोळा करत असेल तर अशा लोकप्रतिनिधीला येणाऱ्या निवडणुकीत जनता सबक शिकवेल का ? याबाबत तर्कवितर्क लावल्या जातंआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here