Home मुंबई जुनी पेन्शन साठी १४ डिसेंबर पासून राज्यातील १७ लाख कर्मचारी जाणार बेमुदत...

जुनी पेन्शन साठी १४ डिसेंबर पासून राज्यातील १७ लाख कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

           जुनी पेन्शन मागणीचा मुद्दा पुन्हा गाजणार

मुंबई  :-  राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून जुनी पेन्शन लागू करावी; या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. जुनी पेन्शन व इतर मागण्यांच्या अनुषंगाने माझे कुटुंब, माझी पेन्शन अंतर्गत जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. राज्यातील १७ लाख कर्मचारी मार्च महिन्यात सात दिवसांच्या संपावर गेले होते.

शासनाने आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्यास विनंती केली. आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीला वारंवार मुदतवाढ दिल्याने व अद्यापही समितीचा अहवाल सादर न झाल्याने कर्मचारी नाराज आहेत. याकडे पुन्हा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यात जिल्ह्यातील कर्मचारीसुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

यापूर्वी कर्मचान्यांनी मार्च महिन्यात बेमुदत संप पुकारला होता. मात्र, सरकारच्या आश्वास नानंतर संप मागे घेण्यात आला; पण सात महिन्यांचा कालावधी लोटूनही शासनाने यावर कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी १४ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here